Satara Dcc Bank Chairman : भाजप पक्षांतर्गत कुरघोड्या कोणी केल्या?; शिवेंद्रराजेंच्या कबुलीने नव्या वादाला तोंड फुटलं

Shivendraraje Bhosale News : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून महायुतीत मतभेद वाढले आहेत. जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वक्तव्यांमधून भाजपमधील अंतर्गत कुरबुरी आणि नेतृत्वावरील मतभेद सार्वजनिक झाले आहेत.
Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosale Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 20 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावरून महायुतीत धूसफूस सुरू झाली आहे. एकीकडे महायुतीमधील पक्षांमध्ये कुरबुरी वाढलेल्या असताना भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत वादाला तोंड फुटल्याचे दिसून येत आहे. जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाबाबत काय ठरलं होतं, हे शिवेंद्रराजेंना विचारा, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलं हेातं. त्यावर विजय झाला तर आमच्यामुळं आणि पराभव झाला तर शिवेंद्रराजेंना विचारा, असं कसं चालेल, असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केला हेाता. त्यानंतर त्यांनी आज पक्षांतर्गत कुरघड्या झाल्याचे जाहीररित्या मान्य केले.

सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून महायुतीमध्ये सध्या अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. निवडीनंतर काल जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी मित्रपक्षाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती. ती करताना जयकुमार गोरे यांनी अध्यक्षपदाबाबत महायुतीच्या बैठकीत काय ठरलं हेातं, असा सवाल करताच महायुतीच्या बैठकांमध्ये मी पहिल्यापासून नव्हतो. त्याबाबत तुम्ही शिवेंद्रराजेंना विचारा, असं म्हटलं होतं.

शिवेंद्रराजेंनी पलटवार करताना एखादी गोष्ट झाली तर आमच्यामुळे आणि नाही झाली तर शिवेंद्रसिंहराजेंना विचारा, असं कसं, असा सवाल केला होता. तसेच, आज त्यांनी माध्यमांशी बोलतानाही पक्षांतर्गत कुरघोडी झाल्याचे मान्य केले.

ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द पाळण्यासाठी आणि युती टिकवण्यासाठी मी प्रयत्न केला. माझ्याकडे पुरेसे मतदान असतानाही आपण माघार घेत कार्यकर्त्यांची समजूत काढल्याचे मंत्री शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले..

Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosale : ‘आमचा निर्णय झालाय’ म्हणत मकरंदआबा अन्‌ शंभूराज देसाईंनी वेगळा निर्णय घेतला : शिवेंद्रराजेंनी सांगितली इनसाईड स्टोरी

आमच्या काही उमेदवारांवर कुरघोड्या करण्याचे काम केले गेले, ही वस्तुस्थिती आहे. पण त्या उघड झाल्या नाहीत. जिल्ह्यात पक्षांतर्गत कुरघोड्या चालू होत्या, पण मी पटापटा पावलं टाकल्यामुळे त्या यशस्वी झाल्या नाहीत. पण त्याचा फटका मतदानात बसला, ही वस्तुस्थिती आहे, असे सांगून त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना सुनावले.

Shivendraraje Bhosale
Solapur Dcc Bank : सुप्रीम कोर्टाचा मोहिते-पाटील, संजयमामा, जगताप, माने, आवताडे, हसापुरेंना दणका; निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेपास नकार देत फेटाळले अपिल

जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत वरिष्ठांच्या भूमिकेबद्दल मी भाष्य करू शकत नाही. मात्र, पक्ष म्हणून माझी भूमिका मी त्याच दिवशी स्पष्ट केली असल्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.