MLA Jaykumar Gore Latest News in Marathi,
MLA Jaykumar Gore Latest News in Marathi, sarkarnama

आमदार गोरेंच्या जामीन अर्जावर आज निर्णय

या गुन्ह्यामध्ये संजय काटकर Sanjay Katkar याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये In judicial custody ठेवण्याचे आदेश न्यायालयाने Court दिले होते.
Published on

वडूज : मायणी (ता. खटाव) येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यासंदर्भात भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर वडूजचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाची बाजू ऐकून आज (शुक्रवार) पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती दिली. (MLA Jaykumar Gore Latest News in Marathi)

मायणी येथील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (रा. विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल, ता. माण) व अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली आहे.

MLA Jaykumar Gore Latest News in Marathi,
आमदार जयकुमार गोरेंसह पाचजणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

यापूर्वी या गुन्ह्यामध्ये संजय काटकर याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. काल अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. यावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने याबाबतचा निकाल उद्या (शुक्रवारी) देणार असल्याचे सांगितले होते. याबाबत फिर्यादीच्या बाजूने सरकारी वकील मिलिंद ओक यांनी बाजू मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com