Satara NCP News: भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांच्या विरोधात सातारा व जावळीत राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी भाजपचे युवा नेते अमित कदम Amit Kadam यांचा येत्या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश होत आहे. या प्रवेशामुळे सातारा, जावळीत राष्ट्रवादीला NCP दीपक पवार Deepak Pawar यांच्यासोबत अमित कदम यांच्या रूपाने आणखी एक हक्काचा नेता मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर अमित कदमांचा हा राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्याचे बोलले जात आहे;
सातारा- जावळी मतदारसंघात यापूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची मोठी ताकद होती; पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते भाजपमधून आमदार झाले. त्यामुळे सातारा- जावळी तालुक्यांतील राष्ट्रवादीची ताकद विभागली गेली.
आमदार शशिकांत शिंदेंच्या माध्यमातून जावळीत पुन्हा राष्ट्रवादीची ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला; पण त्यांचे कोरेगाव मतदारसंघांकडे दुर्लक्ष होईल, म्हणून त्यांनी जावळीत फारसे लक्ष दिले नाही; पण शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शशिकांत शिंदेंनी जावळीत लक्ष घालण्यास सुरुवात केली.
तोपर्यंत आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा, जावळीत आपले वर्चस्व अधिक घट्ट केले. शशिकांत शिंदेंचा सातारा, जावळीतील हस्तक्षेप दूर करण्यासाठी त्यांना कोरेगावात अडचणीत आणण्याचे काम राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांनी केले. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडे सातारा, जावळीत शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात दीपक पवार वगळता सक्षम उमेदवार नाही.
परिणामी, पक्षाची या दोन तालुक्यांत पुन्हा ताकद वाढावी, आगामी निवडणुकीची तयारी म्हणून २०१७ मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले युवा नेते अमित कदम हे पुन्हा स्वगृही येणार आहेत. त्यासाठी येत्या रविवारी (ता. ९) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत श्री. कदम राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीसाठी हा प्रवेश महत्त्वाचा आहे.
श्री. कदम यांची राजकीय कारकीर्द पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य व शिक्षण व अर्थ समिती सभापतिपदापर्यंत राहिली आहे. भाजपमध्ये असूनही त्यांना शिवेंद्रराजेंमुळे फारसे काम करता आलेले नाही, तसेच खासदार उदयनराजेंना ते मानणारे असल्याने त्यांना आमदार गटाकडून विरोधच होत राहिला. गेल्या वर्षे, दीड वर्षांपासून श्री. कदम राष्ट्रवादी प्रवेशाची वाट पाहात होते. त्यांना प्रवेशाच्या मुहूर्ताला अजित पवारांची वेळ मिळत नव्हती. येत्या रविवारचा मुहूर्त मिळाला आहे. या प्रवेशानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सातारा, जावळी मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.