Bhagirath Bhalke : ‘ए प्रिन्स...निवडणुकीत तू माझा बाप काढला, पण ह्या दाढीचा अन्‌ टोपीचा हाबडा तुला सहन होणार नाही’

Pandharpur Nagar Parishad Election 2025 : पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीतील विजयानंतर भगीरथ भालके यांनी भाजपवर आक्रमक टीका करत माजी आमदार प्रशांत परिचारकांना थेट राजकीय आव्हान दिले.
Bhagirath Bhalke
Bhagirath BhalkeSarkarnama
Published on
Updated on
  1. पंढरपूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पत्नी प्रणिता भालके यांच्या दणदणीत विजयानंतर भगीरथ भालके यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली.

  2. ११ हजारांहून अधिक मताधिक्याचा दाखला देत भालकेंनी २०२९ मध्ये निवडणूक लढवण्याचे खुले आव्हान परिचारकांना दिले.

  3. प्रणिता भालकेंच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट करत, विरोधकांनी सूडभावनेने वागल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही दिला.

Pandharpur, 22 December : ए प्रिन्स चार्ल्स, तुला पंढरपूरची गर्दी बघायची होती ना? आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम आणि आपुलकी काय असते, हे एकदा येऊन बघ. निवडणुकीत तू माझा बाप काढला. आज पुन्हा रात्रभर तुला माझा बाप दिसेल. पंढरपूरच्या 2021 च्या पोटनिवडणुकीतून तू पळून गेला. 2024 मध्येही येतो येतो म्हणून रणांगणातून पळला. शिवतीर्थवरून तुला माझं खुलं चॅलेंज आहे. आज 2025 आहे, तुझ्याकडे आणखी चार वर्षे आहेत. तू तुझ्या बापजाद्यांची खरी औलाद असशील तर 2029 मध्ये पुन्हा रिंगणात ये, पळून जाऊ नको, मी तुझी वाट बघतोय, असे खुले चॅलेंज भगीरथ भालके यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांना नाव न घेता दिले.

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी प्रणिता भगीरथ भालके यांच्या विजयानंतर झालेल्या सभेत बोलताना भगीरथ भालके यांनी प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांच्यावर सडकून टीका केली.

भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) म्हणाले, पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक विकासाच्या मुद्यावर घेऊन जायची असं मी पहिल्या दिवसांपासून सांगत होतो. पण कधी माझ्यावर, काकांवर, दिलीपबापूंवर, अनिलदादांवर तर कधी माझ्या पत्नीवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. ती टीका आम्ही सहन केली. पण हयात नसलेल्या माझ्या वडिलांवर टीका करत असताना तू नैतिकता सोडली असली तर आम्ही नैतिकता सोडली नाही. पण त्याच दिवशी सांगितलं होतं की, ह्या दाढीचा आणि टोपीचा हाबडा तुला सहन होणार नाही.

पंढरपूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक-दोन नव्हे तर अकरा हजार १३६ मतांनी विजय मिळविला आहे. पाच वर्षांच्या प्रतिकूल परिस्थितीत भारतनानांच्या आशीवार्दाने आणि तुमच्या सहकार्याने आज आपल्या अंगावर गुलाल पडला आहे. त्यामुळे भविष्यकाळात जाईल तिथं गुलाल घेतला नाही तर भारत भालकेंची औलाद सांगणार नाही, असेही भालकेंनी स्पष्ट केले.

भालके म्हणाले, माझ्यावर अनेक आरोप केले, अनेकांनी सांगितलं भालके संपलं. पण तुमच्या बापाला ते संपत नसतात. पंढरपूरची निवडणूक संपल्यावर मंगळवेढ्याला आला. तिथं काय म्हणाला. पंढरपूरचा विजय म्हणजे काळ्या दगड्यावरची पांढरी रेघ आहे. त्याला भालकेंनी दगडावर रेघ ओढून उत्तर दिले. नुसता पंढरपूरचा नव्हं तर मंगळवेढ्याचाही गुलाल घेऊन आला आहे.

Bhagirath Bhalke
Dr. Atul Bhosale : आमदार अतुल भोसलेंचा डाव ठरला गेमचेंजर; पृथ्वीराजबाबांच्या बालेकिल्ल्यात प्रथमच कमळ फुलले!

माझ्यावर प्रेम करून तुम्ही कार्यकर्त्यांच्या निष्ठा, प्रेमामुळे भारतनानांना जीवंत ठेवण्याचे काम केले आहे, त्यामुळे तुमच्या ऋणातून भालके कुटुंबीय कधीही उतराई होऊ शकत नाही. पण प्रिन्स आणि त्याच्या बगलबच्चांना माझं सांगणं आहे की, अकरा हजारांहून अधिकचे मताधिक्य पंढरपूरचे जनतेने दिलेले आहे, असा इशारा भालकेंनी परिचारकांना दिला.

भगीरथ भालके म्हणाले, प्रिन्स चार्ल्सच्या घरातल्यांनी माझ्यावर तिसरा गुन्हा अब्रुनुकसानीचा दाखल केला आहे. मी त्यांचा भ्रष्टाचार दाखवला. पण हट... उद्यापासून या चाळीस वर्षांच्या पापाचा घडा शिवतीर्थवरून दाखवला. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीतील पराभावानंतर तुला अब्रू तरी शिल्लक राहिली आहे की हे तपास.

‘प्रणिता भालकेंच्या निर्णयात कधीही हस्तक्षेप करणार नाही’

प्रणिता भालके आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक काम करायला सक्षम आहेत. प्रणिता भालकेंच्या निर्णयात आणि अधिकारात भगीरथ भालके कधीही हस्तक्षेप करणार नाही, असा शब्द देतो. पण प्रिन्स तू जरा सूड भावनेने त्या ठिकाणी आलास तर जशास तसे उत्तर द्यायला मागंपुढं पाहणार नाही, असा इशाराही भालकेंनी दिला.

Bhagirath Bhalke
Eknath Shinde Politic's : सोलापुरात भाजपला एकनाथ शिंदेंची टशन; तीन ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष, तर 56 नगरसेवक विजयी
  1. भगीरथ भालके यांनी कुणाला आव्हान दिले?
    → नाव न घेता माजी आमदार प्रशांत परिचारक यांना.

  2. हा वक्तव्याचा प्रसंग कशानंतर घडला?
    → पंढरपूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रणिता भालकेंच्या विजयानंतर.

  3. भालकेंनी मताधिक्याबाबत काय सांगितले?
    → ११ हजारांहून अधिक मतांनी मिळालेला विजय जनतेचा स्पष्ट कौल असल्याचे त्यांनी सांगितले.

  4. प्रणिता भालकेंबाबत भगीरथ भालकेंची भूमिका काय आहे?
    → त्यांच्या निर्णयात किंवा अधिकारात कधीही हस्तक्षेप करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com