
Kolhapur, 02 may : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (ता. 02 मे) कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडच्या दौऱ्यावर आहेत. चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाध्यक्ष अजित पवारांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. मात्र, अजितदादांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्याचे कारणही त्यांनी आपल्या भाषणातून दिले, त्यामुळे सहकाऱ्यांचा पराभव अजितदादांच्या किती जिव्हारी लागला आहे, हे दिसून येते.
चंदगड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार राजेश पाटील (Rajesh Patil) यांना संधी दिली होती. मात्र, चंदगडमधून भाजपचे शिवाजी पाटील यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यांनी राजेश पाटील यांचा २४ हजार १३४ मतांनी पराभव केला. हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. त्यातून त्यांनी आज चंदगड कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास नकार दिला. त्याचे कारणही त्यांनीच सांगितले आहे.
मी आज कोल्हापुरी फेटा बांधून घेतला नाही. कारण माझा उजवा हात असलेला राजेश पाटील चंदगडमधून पराभूत झाला आहे. तुम्ही राजेश पाटील यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून द्या. तुम्ही म्हणाल तेवढे फेटे मी बांधून घेईल, अशा शब्दांत अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.
ते म्हणाले, मागील टर्ममध्ये आम्ही चंदगडसाठी तब्बल १६०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून अनेक विकास कामे उभी राहिली आहेत. तरीही तुम्हा राजेश पाटील यांना पराभूत केले. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे सर्वच सर्व उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, आमचे राजेश पाटील हेच निवडून आणले नाहीत, याचे मला खुप दुःख आहे.
‘अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं पहायचंय’
माजी आमदार राजेश पाटील यांना आपल्या भाषणावेळी आश्रू अनावर झाले होते. हुंदका देतच राजेश पाटील म्हणाले, सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण कुठे माशी शिंकली कळलं नाही. मात्र चंदगडची जनता कायम आपल्यासोबत राहील, हेही सांगायला ते विसरले नाहीत. अजित पवार मुख्यमंत्री झाल्याशिवाय आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. माझे डोळे मिटण्याआधी अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहे, अशी इच्छाही राजेश पाटील यांनी बोलून दाखवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.