Devendra Fadnavis : 'मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटलेत त्यांना...', देवेंद्र फडणवीसांच्या टार्गेटवर संजय राऊत

Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खासदार उदयनराजे यांच्यासमवेत बैलगाडीतून प्रवास करीत उद्घाटनस्थळी पोहोचले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

हेमंत पवार

karad : संजय राऊत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टार्गेट करत आहेत. आमदार अपात्रता प्रकरणानंतर राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील नेत्यांच्या सांगण्यावरून विधानसभा अध्यक्षांनी असा निकाल लावल्याची टीकादेखील केली आहे. या टीकेला शिंदे गटातील तसेच भाजपमधील आमदार प्रत्युत्तर देत आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे.

Devendra Fadnavis
Eknath Shinde: '...तर मग एकनाथ शिंदे तीस वर्षे मुख्यमंत्री'!

'कराडच्या कृषी प्रदर्शनात 42 लाख रुपयांचा बैल आणण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक बैलही आलेला आहे. या प्रदर्शनात अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी आणण्यात आल्या आहेत. प्रदर्शनाच्या संयोजकांना एकच विनंती आहे, की आमच्या मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले आहेत. त्यांचा काही बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे योजना असेल तर मला सांगा,' असे म्हणत संजय राऊत यांचे नाव न घेता टोला देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) यांनी लगावला. कराड येथील छत्रपती शिवाजीमहाराज स्टेडियमवर आयोजित कृष्णा कृषी महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते इतके टीव्हीवर बोलतात की त्यांचा काही बंदोबस्त करायची योजना असेल तर मला सांगा. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे तुम्ही आम्हाला शिकवा, असे फडणवीस संजय राऊत यांना उद्देशून म्हणाले असता, टाळ्या वाजवून उपस्थितांनी दाद दिली. कराडच्या कृषी प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, डॉ सुरेश भोसले, सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले आदी उपस्थित होते.

बैलगाडीतून आगमन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खासदार उदयनराजे यांच्यासमवेत बैलगाडीतून प्रवास करीत उद्घाटनस्थळी पोहोचले. बैलगाडीतून प्रवास करीत असताना फडणवीस आणि उदयनराजे भोसले दोघांनीही बैलगाडीचे सारथ्य केले. कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने फडणवीस सातारा लोकसभेचा भाजपचा उमेदवार कोण असेल याचे संकेत देतील, अशी शक्यता होती. मात्र, फडणवीस यांनी यावर थेट काही बोलण्याचे तरी टाळल्याचे दिसून आले.

(Edited By Roshan More)

Devendra Fadnavis
Ajit Pawar : आर. आर. आबांच्या बालेकिल्ल्यात अजितदादा गटाची एन्ट्री; स्थानिक नेता गळाला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com