Devendra Fadnavis : कराडमध्ये फडणवीस - उदयनराजेंचा बैलगाडीतून प्रवास...

Inauguration of Krishna Agricultural and Industrial Festival in Karad : कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन...
Devendra Fadnavis, Udayanraje Bhosale
Devendra Fadnavis, Udayanraje BhosaleSarkarnama

Karad Devendra Fadnavis Bullcart News : कराड येथील छत्रपती शिवाजीमहाराज स्टेडियमवर आयोजित कृष्णा कृषी महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. त्यापूर्वी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासमवेत बैलगाडीतून उद्घाटनस्थळी येत मी ही शेतकरी असल्याचे दाखवून दिले.

कृष्णाकाठाचे सहकारमहर्षी (स्व.) जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत कृष्णा कृषी परिषदेच्या माध्यमातून आणि कृष्णा विश्व विद्यापीठ व कृष्णा सहकारी बँकेच्या सहकार्यातून कराड येथील छत्रपती शिवाजीमहाराज स्टेडियमवर आजपासून (ता. 17 ते 21 जानेवारी) दरम्यान आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis, Udayanraje Bhosale
Chandrakant Patil : 'स्वच्छतेची अनुभूती का घ्यावी', चंद्रकांत पाटलांनी सांगितले कारण!

या कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस खासदार उदयनराजे यांच्यासमवेत बैलगाडीतून प्रवास करीत उद्घाटनस्थळी पोहोचले.

बैलगाडीतून प्रवास करीत असताना फडणवीस आणि उदयनराजे भोसले दोघांनीही बैलगाडीचे सारथ्य केले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, डॉ. सुरेश भोसले, सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लक्षवेधी प्रवेशद्वार

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे 350 वे वर्ष सर्वत्र साजरे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे प्रवेशद्वार शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या संकल्पनेवर उभारण्यात आले आहे. त्याचसोबत अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्ताने प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आली आहे.

(Edited by Amol Sutar)

R...

Devendra Fadnavis, Udayanraje Bhosale
Bhandara : कार्यकर्त्यांच्या कुपोषणाचा मुद्दा; महायुतीतून कोण देणार, याकडे लक्ष?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com