Ajit Pawar : मंत्री नितेश राणेंना अजित पवारांनी फटकारलं, म्हणाले की, ‘या देशातला मुस्लिम...’

Ajit Pawar On Nitesh Rane : गेल्या काही दिवसांपासून मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे मुस्लिम समाजाला टार्गेट करत आहेत. आताही त्यांनी हिंदू मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या धोरणाची घोषणा केली आहे. यावरून नवा वाद सुरू झाला आहे.
Nitesh Rane And Ajit Pawar
Nitesh Rane And Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Satara News : भाजप नेते तथा राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला टार्गेट केलं आहे. अनेकदा त्यांनी या समाजाबद्दल जहरी टीका केली आहे. यावरून त्यांच्यावरही जोरदार टीका झाली आहे. आताही हिंदू मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या धोरणाची घोषणा करून त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या या घोषणेवरून विरोधकांकडून आता टीका होत आहे.

मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून हिंदू समाजातील खाटिक वर्गाला हे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. यावरून विरोधकांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यात नवा वाद उकरुन काढण्यासाठी नवा फंडा भाजपने आणल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी होता. यावरून तर आप आणि एआयएमआयएम यांनीही निषेध नोंदवला होता. यानंतर रोहित पवारांनी मल्हार प्रमाणपत्र देणारी कंपनी कोणाची? असा सवाल करत नितेश राणेंवर तोफ डागली होती.

यादरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 112 व्या जयंती निमित्त कराड येथील प्रिती संगमावर करण्यासाठी आले होते.

Nitesh Rane And Ajit Pawar
Ajit Pawar : 'मस्तीच उतरवतो'; अजित पवारांचा धान घोटाळ्यावर अधिकाऱ्यांना इशारा

यावेळी अजित पवार यांनी, नितेश राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, सरकारमधील आणि विरोधकांमधील सदस्यांनी कोणतंही वक्तव्य करण्याआधी कायदा-सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याचे भान राखावे. तशी काळजी घ्यावी. नितेश राणे असं का वक्तव्य केलं आहे? याचे कारण मला माहित नाही. तर त्यामागचा वक्तव्यामागचा हेतूदेखील माहित नाही. पंरतु आपल्या देशाबद्दल अभिमान असणार मुस्लिम समाज देशप्रेमीच आहे, असे म्हणत अजित पवार यानी नितेश राणेंना फटकारलं आहे.

तसेच आपल्या महाराष्ट्रात देशाबद्दल प्रेम असणारा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात असून इतिहास आपण वाचला आहे. इतिहासात याची अनेक उदाहरणे आहेत. मोठमोठ्या लोकांनी जी काही पुस्तक लिहिली त्यात ती आहेत. तर इतिहासाच्या संशोधनातून याची माहिती खोलवर मिळवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जे लोक होते, त्यात मुस्लिमही आहेत. दारुगोळा कोण संभाळत होतं? त्याची कितीतरी उदहारण आपल्याला देता येतील, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केल्यानंतर सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली आहे. यशवंतराव चव्हाणांची शिकवण पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांची विचारधार आम्ही कधीही सोडणार नाही, असे म्हटले आहे. तर आपण जो पर्यंत राजकीय जीवनात आहोत तो पर्यंत चव्हाण साहेबांची विचारधारा मी कदापी सोडणार नाही किंवा ढळू देणार नाही. त्याच विचारधारेने महाराष्ट्राच भलं होणार, सगळ्या समाजाच भलं होणार आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व घटकांना न्याय देण्याच काम केलं जाईल, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Nitesh Rane And Ajit Pawar
Ajit Pawar meeting : अजितदादांनी 'खोक्या'बाबत घेतला मोठा निर्णय; कारण आलं समोर...

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबद्दल अजित पवार बोलताना, प्रश्न सोडवला गेला नसेल तर त्याबाबत मागणी करणं, निवेदन देणं गरजेचं आहे. पण आता अधिवेशन संपल्यावर सातार किंवा पुण्यात याबाबत विभागीय कार्यालयात बैठक घेतली जाईल असेही आश्वासन त्यांनी दिलं आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com