Solapur Politic's : सोलापूर बाजार समितीसाठी दोन्ही देशमुखांच्या गाठीभेटी; माने-कल्याणशेट्टींचा स्टॅट्रेजीवर भर!

Solapur Bazar Samiti Election : भाजपचे जुने जाणते नेते तथा माजी मंत्री सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुखांनी एकत्र येऊन शह दिला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना आणि काँग्रेसमधील काही नेत्यांनी साथ दिली आहे, त्यामुळे निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे.
Solapur Bazar Samiti Election
Solapur Bazar Samiti ElectionSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 19 April : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज अनेक राजकीय घडामोडी घडल्या असून दोन्ही बाजूंनी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. अक्कलकोटचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांना सोबत घेऊन बाजार समिती सर करण्याची मोहिम आखली आहे. मात्र, त्यांना भाजपचे जुने जाणते नेते तथा माजी मंत्री सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुखांनी एकत्र येऊन शह दिला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना आणि काँग्रेसमधील काही नेत्यांनी साथ दिली आहे, त्यामुळे निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे.

सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले शिवसेना नेते तथा रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांची माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी मनीष काळजे यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. भाजपच्या काही नेत्यांनी कोणाशी युती केली, का केली, याची आम्हाला माहिती नाही. पण आमच्या मनीष काळजेंनी सुभाषबापूंना पाठिंबा दिला आहे, आमची नैसर्गिक युती आहे, त्यामुळे आम्ही शब्द पाळणार, असे गोगावले यांनी देशमुखांना भरसभेत शब्द दिला.

सुभाष देशमुख यांच्यानंतर माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख (Vijaykumar Dreshmukh) यांनीही गोगावलेंची भेट घेतली. त्यामुळे दोन्ही देशमुखांनी शिवसेनेकडे जोरदार फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेकडे किती मते आहेत, हा कळीचा मुद्दा आहे. एकीकडे देशमुखांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतली असतानाच प्रमुख नेत्यांसोबत चर्चाही केली आहे.

Solapur Bazar Samiti Election
Sanjay Shinde : मोठी बातमी : विधानसभेनंतर ‘आदिनाथ’च्या निवडणुकीतही संजय शिंदेंचा धक्कादायक पराभव

विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात सुभाष देशमुख, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. सध्या सुभाष देशमुखांच्या नेतृत्वाखाली स्टॅट्रेजी आखली जात आहे. त्यानुसार पुढे त्याची कशी अंमलबजावणी होते, त्यावर देशमुखांच्या पॅनेलचे यश अवलंबून असणार आहे.

Solapur Bazar Samiti Election
Adinath Election Result : जेऊर गटातून नारायण पाटील गटाचे तीनही उमेदवार विजयी; विरोधी उमेदवारांचीही कडवी लढत

दुसरीकडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश वानकर यांच्या घरी बैठक घेतली. त्यात बैठकीला काँग्रेसचे राजशेखर शिवदारे मात्र अनुपस्थित होते. शिवदारेंना मिळालेल्या जागांमुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या पहिल्या टप्प्यात एकमेकांचा अंदाज घेतला जात असल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com