Hari Narke Passed Away : ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. हरी नरके यांचे निधन; पुरोगामी चळवळीचा चेहरा हरपला!

Hari Narke Passed Away In Mumbai : वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Hari Narke Passed Away In Mumbai :
Hari Narke Passed Away In Mumbai :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषेदेचे उपाध्यक्ष हरी नरके यांचे आज बुधवारी निधन झाले आहे. बीकेसीतल्या एशिय़न हार्ट इन्स्टीट्युट मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. थोड्याच वेळात मंत्री छगन भुजबळ बीकेसीतल्या एशिय़न हार्ट इन्स्टीट्युटमध्ये दाखल होत आहेत. आपल्या परखड विचारांसाठी ते प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा चेहरा हरपला आहे. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Hari Narke Passed Away In Mumbai :
PM Modi Big Statement : ठाकरेंनी युती तोडली, आम्ही नाही," ; NDA च्या बैठकीत मोदींचा पलटवार

हरी नरके यांचे हृदय विकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. मुंबईतील बीकेसीतल्या एशियन हार्ट इन्स्टीट्युटमध्ये निधन झाले. डॉ. हरी रामचंद्र नरके यांचा जन्म 1 जून, 1963 ला झाला होता. आज त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एशिअन हार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.

Hari Narke Passed Away In Mumbai :
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा ; 'ते' तुमच्यावर टीका करतील, तुम्ही मुख्यमंत्र्याचं स्वप्न पूर्ण करा..

हरी नरके यांचे लेखन प्रसिद्ध आहे. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा त्यांचे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. त्यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे. सोशल मीडियावर ते सातत्याने सक्रिय होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com