Solapur Politics : फडणवीसांनी मला एक महिना भेट दिली नाही; निष्ठावंत क्षीरसागरांच्या अश्रूंचा बांध फुटला

Sanjay Kshirsagar Join NCP Sharadchandra Pawar Party : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आम्ही अगदी दहा लोकांना बरोबर घेऊन भाजपचे काम करायला सुरुवात केली. आम्हाला 2006 पर्यंच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत केवळ 200, 300 आणि 500 मतं मिळायची. पण, आम्ही कधीही लाजलो नाही. पक्षाचे काम करत राहिलो.
Sanjay Kshirsagar
Sanjay KshirsagarSarkarnama

Solapur, 25 April : मी अनेकदा माझ्या भावना भाजपश्रेष्ठींकडे मुंबईला जाऊन मांडण्याचा प्रयत्न केला. पण, मला भेटही दिली नाही, त्यामुळे मी अगदी हताश होऊन भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी भाजप सोडल्यामुळे आता कोणावरही टीका करणार नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना आता किंमत राहिली नाही. मला एक महिना देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली नाही, यापेक्षा माझं दुर्दैव काही नाही, हे सांगताना मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर यांना अश्रू अनावर झाले.

संजय क्षीरसागर (Sanjay Kshirsagar) यांनी बुधवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना क्षीरसागर यांनी भाजपमध्ये (BJP) झालेल्या कोंडीबद्दल आपले मन मोकळे केले. त्या वेळी त्यांनी भाजपकडून आपल्याला कशी वागणूक मिळाली, हेही सांगितले. मी आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे लढणार आहे. विधानसभेची 2024 ची निवडणूक मी लढवणार आणि जिंकणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Kshirsagar
ShahajiBapu Vs Jankar : फडणवीसांना भेटूनही उत्तम जानकर शरद पवारांकडे का गेले?; शहाजीबापूंची मार्मिक टिपण्णी...

क्षीरसागर म्हणाले, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रभावित होऊन मी 1998-99 मध्ये संघाच्या शाखेतून भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये 2006 पर्यंत संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आम्ही अगदी दहा लोकांना बरोबर घेऊन भाजपचे काम करायला सुरुवात केली. आम्हाला 2006 पर्यंच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत केवळ 200, 300 आणि 500 मतं मिळायची. पण, आम्ही कधीही लाजलो नाही. पक्षाचे काम करत राहिलो. पण, 2006 पासून सोलापूर जिल्ह्यातील काही नेत्यांच्या सांगण्यावरून पक्षाने माझ्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. त्यानंतरही 2006 ते 2014 पर्यंत भाजपचा माजी पदाधिकारी म्हणून मी जनतेची कामे करत राहिलो.

शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर 2014 मध्ये माझा सर्व्हे बघून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मोहोळ विधानसभेची उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत मला क्रमांक दोनची 54 हजार मतं मिळाली. एवढी मतं मिळूनही जिल्ह्यातील काही नेत्यांनी माझ्याकडं दुर्लक्ष करणं चालूच ठेवलं. खरं तर 2019 च्या निवडणुकीत मोहोळ मतदारसंघ हा भाजपकडे घेऊन मला उमेदवारी देत जनतेची सेवा करण्याची संधी भाजपने मला द्यायला हवी होती. त्या निवडणुकीत शिवसेनेने माझी उमेदवारी अनपेक्षितपणे जाहीर केली. पण, फडणवीसांच्या सांगण्यावरून मी शिवसेनेची ती उमेदवारी घेतली नाही आणि भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला, अशी आठवणही क्षीरसागर यांनी सांगितली.

Sanjay Kshirsagar
Solapur NCP : उत्तम जानकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही; जिल्हाध्यक्षांनी सुनावले

क्षीरसागर यांनी सांगितले, मला वाटलं होतं की 2024 मध्ये आपला विचार निश्चितपणे होईल. पण भाजपने मला दहा वर्षे पक्ष संघटनेच्या प्रक्रियेपासून बाजूला ठेवलं. एवढी वर्षे भाजपमध्ये काम करूनही जिल्ह्याच्या पक्षाच्या बैठकीतसुद्धा मला समोरच्या बाजूला खाली बसावं लागायचं. तरीही मी अपमान मानायचो नाही. त्यानंतर मी २०२४ मध्ये लोकसभेची उमेदवारी मागितली हेाती. तत्पूर्वी 2009, 2014 आणि 2019 मध्येही मागितली होती. पण स्थानिक असूनही सातत्याने मला डावलण्यात आलं.

Sanjay Kshirsagar
Sambhajinagar Lok Sabha 2024 : दोन तास उरले, वंचितचे अजून ठरेना; एमआयएमला संभाजीनगरात छुपा पाठिंबा?

गेली 25 वर्षे ज्या जनतेने माझ्यावर प्रेम केलं, पाठबळ दिलं. त्याची कुठचीही उतराई माझ्याकडून झाली नाही. कारण 25 वर्षांच्या कालखंडात 2014 ते 2019 ही पाच वर्षे भाजपची सत्ता होती आणि आताही 2022 पासून राज्यात सत्ता आहे. या सात वर्षांच्या सत्तेत मला भाजपकडून सात रुपयांचासुद्धा निधी मिळाला नाही. मी पक्षाचा कुठलाही लाभार्थी नाही. पण, फडणवीसांनी मला मदत केली. त्यांची इच्छा असूनही जिल्ह्यातील काही नेत्यांच्या सांगण्यावरून मला डावललं गेलं, असेही त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले, मोहोळ मतदारसंघाचा दौरा करून मी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. कार्यकर्त्यांनी मला महाविकास आघाडीसोबत जाण्याचा सल्ला देताना तुम्ही भाजपमध्ये राहू नका, असेही सांगितले. कठीण काळात आपण भाजपबरोबर काम केलं. देशपातळीवर अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत, त्यामुळे भाजपला आपल्यासारख्या निष्ठावंत लोकांची गरज नाही.

R

Sanjay Kshirsagar
Sangali Politics: काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदाराच्या गाडीवर दगडफेक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com