

Solapur, 09 January : सोलापूर महापालिकेची निवडणूक ही एकतर्फी असून विरोधकांचे अस्तित्व अगदी नगण्य दिसून येते. सोलापूरच्या विकासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं योगदान असून शहरातील जनतेला विनंती करण्यासाठी ते उद्या येत आहेत. फडणवीस यांची उद्याची सभा ही महापालिका निवडणुकीतील टर्निंग पाईंट ठरेल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बोलून दाखवला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची उद्या (ता. 10 जानेवारी) सोलापुरात सभा होत आहे. त्याच्या तयारीची पाहणी पालकमंत्री गोरे यांनी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना गोरे यांनी सोलापूर महापालिका निवडणुकीबाबत भाष्य केले.
सोलापूर (Solapur) शहराचं वातावरण हे भाजपमय आहे. जनतेने भाजपला निवडून द्यायचं ठरवलं आहे. विरोधी पॅनेलचे अस्तित्वच नगण्य दिसून येत आहे. उमेदवार ताकदीने प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचे सोलापूरच्या विकासात मोठं योगदान असून त्यांचं शहरावर प्रेम आहे. विमानसेवा, दुहेरी पाईपलाईन आणि इतर प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे, असे गोरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या (ता. 10 जानेवारी) सोलापूरच्या जनतेला विनंती करण्यासाठी शहरात येत आहेत. सोलापूरची जनताही त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते, त्यामुळे फडणवीस यांची उद्याची सभा महापालिका निवडणुकीतील ‘टर्निंग पाईंट’ ठरेल, असा विश्वास गोरे यांनी बोलून दाखवला.
ते म्हणाले, येत्या पाच वर्षांत शहराच्या विकासासाठी भाजप काय करणार आहे, हे सांगण्यासाठी फडणवीस हे उद्या येत आहेत. सोलापूर शहरातील चौका-चौकांत झालेला विकास दिसून येत आहे. शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे काम भाजपने केले आहे.
रोजगारासाठी बाहेर गेलेल्या तरुणांना पुन्हा सोलापुरात आणून त्यांच्या रोजगारासाठी आयटी पार्कचा संकल्प फडणवीस यांनी केला आहे. त्यासाठी जमीन बघितली आहे, आयटी पार्कसाठी मान्यताही दिली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत बदलेले सोलापूर शहर आपल्याला बघायला मिळेल, असा विश्वास गोरेंनी व्यक्त केला.
ते म्हणाले, मी कुणालाही कमी लेखणार नाही. विरोधक हे विरोधक असतात. जनता ठरवत असते. पण सोलापुरात एकतर्फी लढाई आहे, एखाद-दुसऱ्या प्रभागात चुटुपुटूची लढाई दिसत आहे. सोलापूरच्या लाडक्या बहिणींचा फडणवीसांवर विश्वास आहे. लाडक्या बहिणींचे आशीर्वाद घेण्यासाठी ते उद्या शहरात येत आहेत, येत्या १६ तारखेला त्याचं प्रत्यंतर येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.