Laxman Hake : लक्ष्मण हाकेंच्या विरोधात राष्ट्रवादीचे कायदेशीर पाऊल; ‘सात दिवसांत माफी मागा; अन्यथा...’

NCP Send Legal notice : आमच्या म्हाज्योतीच्या पोरांना निधी देत नाय, असा आरोप करताना हाके यांनी अजित पवार यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. याअगोदर हाके यांनी पवारांच्या विरोधात बेताल वक्तव्य केलेली होती.
Ajit Pawar-Laxman Hake
Ajit Pawar-Laxman HakeSarkarnama
Published on
Updated on

Baramati, 06 July : गेल्या काही दिवसांपासून ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवत आहेत. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. ‘महाज्योती’ला पैसे दिले जात नाही. अर्थमंत्री अजित पवार हे ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि संस्थांना पैसे देत नाहीत, असा आरोप केला होता. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष्मण हाकेंना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. हाकेंनी सात दिवसांत माफी मागावी; अन्यथा न्यायालयात खेचण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्रा. लक्ष्मण हाके हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करत शिवराळ भाषेत शिवीगाळ करत आहेत. त्यामुळे बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी हाके यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. हाके यांनी माफी न मागितल्यास त्यांना न्यायालयात खेचण्याचा इशाराही दिला आहे.

अजित पवार यांच्याकडील अर्थ खात्यामुळे राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. मराठा समाजासाठी काम करणाऱ्या सारथी संस्थेला अजित पवारांकडून निधी देण्यात आला आहे. पण, महाज्योतीकडे दुर्लक्ष केलं जातं, आहे, त्यामुळेच राज्यभरातील ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, ते शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत, असा आरोप प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला होता.

आमच्या म्हाज्योतीच्या पोरांना निधी देत नाय, असा आरोप करताना हाके यांनी अजित पवार यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. याअगोदर हाके यांनी पवारांच्या विरोधात जाणुनबूजुन बेताल वक्तव्य केलेली होती.

Ajit Pawar-Laxman Hake
BJP Ganesh Hake : भाजप नेत्याकडून शेतकऱ्याची थट्टा; मदतीऐवजी औत ओढतानांचं फोटोशूट, खुलासा करता करता दमछाक

प्रा. लक्ष्मण हाके यांच्या विरोधात बारामती तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यातूनच राष्ट्रवादीने हाके यांना कायदेशीर नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar-Laxman Hake
Thackeray Brother : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले स्वागत; मराठीबाबतच्या भूमिकेचेही केले समर्थन!

प्रा. हाके यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नितीन यादव यांनी ॲड. शंतनू माळशिकारे यांच्या वतीने आज (ता. 06 जुलै) नोटीस पाठवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची येत्या सात दिवसांत हाके यांनी लेखी माफी मागावी. हाके यांनी सात दिवसांत लेखी माफी न मागितल्यास त्यांना न्यायालयात खेचून दिवाणी, फौजदारी आणि अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असेही नोटिशीत म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com