Fadnavis On Pandharpur Corridor : आमदार समाधान आवताडेंच्या समोरच पंढरपूर कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान....

Chief Minister Devendra Fadnavis Statement : पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही काम करत आहोत. कॉरिडॉरमुळे आम्ही कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही.
Samadhan Autade-Devendra Fadnavis
Samadhan Autade-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 06 July : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला पंढरपूर कॉरिडॉरबाबत प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. खुद्द जिल्हाधिकारी प्रत्यक्ष व्यापारी, नागरिक आणि दुकानदारांशी बोलणी करत आहेत. दुसरीकडे, पंढरपूर कॉरिडॉरबाबत एकमत होताना दिसत नाही. त्यावर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढीच्या महापुजेनंतर ‘सर्वांना विश्वास घेऊन आम्ही पंढरपूर कॉरिडॉर करणार आहोत’, असे आमदार समाधान आवताडेंच्या समोरच सांगितले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी पंढरपूर कॉरिडॉरबाबत भाष्य केले. या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार समाधान आवताडे यांच्यासह मान्यवर या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंढरपूर कॉरिडॉरच्या (Pandharpur Corridor) संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही काम करत आहोत. कॉरिडॉरमुळे आम्ही कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही. तो दुकानदार असो, तो घरमालक असो किंवा तो सामान्य माणूस असेल कोणाचेही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून पंढरपूरमध्ये आपण कॉरिडॉर करणार आहोत.

पंढरपूरच्या कॉरिडॉरसंदर्भात व्यापारी, नागरिक आणि घरमालकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केलेली आहे. त्यांनी अनेक लोकांशी चर्चा करून त्यांच्या शंकाही दूर केलेल्या आहेत. यापुढेही कॉरिडॉर संदर्भात लोकांच्या काही शंका आहेत, त्या दूर करून हा प्रकल्प आपण मार्गी लावणार आहोत, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

Samadhan Autade-Devendra Fadnavis
Laxman Hake : लक्ष्मण हाकेंच्या विरोधात राष्ट्रवादीचे कायदेशीर पाऊल; ‘सात दिवसांत माफी मागा; अन्यथा...’

फडणवीस म्हणाले, मी माध्यमाच्या द्वारे पंढरपूरच्या मंदिर परिसरातील नागरिक, भाविक, दुकानदार आणि व्यावसायिक या सर्वांना अश्वस्त करू इच्छितो की, कुणालाही उद्‌ध्वस्त न करता सगळ्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करून पंढरपूरच्या कॉरिडॉरचे काम आपण पूर्ण करणार आहोत.

आपण सन्मार्गाने चालावं, आपण सुबुद्धीनं चालावं. आपण सुबुद्धीनं चाललो, तर दुसऱ्यांना सुबुद्धी येईलच, ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची अवस्था तुम्ही सर्वांनी बघितलीच आहे, असा टोलाही फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.

Samadhan Autade-Devendra Fadnavis
BJP Ganesh Hake : भाजप नेत्याकडून शेतकऱ्याची थट्टा; मदतीऐवजी औत ओढतानांचं फोटोशूट, खुलासा करता करता दमछाक

विठ्ठल मंदिरात पूर्वी व्हीआयपी दर्शन पद्धती होती. पण, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यंदा व्हीआयपी दर्शनाची पद्धत बंद केली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. व्हीआयपी दर्शन बंद करण्याची चांगली परंपरा आहे, ही परंपरा अशीच चालू ठेवली पाहिजे, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com