Gokul Results: फडणवीसांची रणनीती, 3 मंत्री, 2 खासदार अन् 10 आमदारांची फौज सोबतीला, तरी मुलाचा पराभव, 'गोकुळ' गमावलं; मुश्रीफांनी सांगितलं नेमकं कुठं चुकलं?

Gokul Election 2026: कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण फिरवणारी निवडणूक म्हणून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. कोल्हापूसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळच्या निवडणुकीत दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
Gokul Election; Hasan Mushrif
Gokul Election; Hasan Mushrifsarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण फिरवणारी निवडणूक म्हणून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. कोल्हापूसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळच्या निवडणुकीत दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. काँग्रेसच्या सतेज पाटलांनी महायुतीच्या मातब्बर मंत्री,आमदार खासदारांना धोबापछाड देत गोकुळची त्यांच्या पॅनलनं खेचून आणली आहे. गोकुळच्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावलेल्या मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांची पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

गोकुळच्या निवडणुकीत कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते यांचे पुत्र आणि विद्यमान अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. गोकुळमधील हा निकाल थेट मुश्रीफांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील वर्चस्वालाच एकप्रकारे हादरा मानला जात आहे. आता हसन मुश्रीफांनी या निवडणुकीतील पराभवानंर पहिली प्रतिक्रिया देताना या निवडणुकीत महायुतीमध्ये शेवटपर्यंत सुरू असलेली भांडणे आणि त्यानंतर झालेली युती कदाचित लोकांना आवडलेली नसावी असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

हसन मुश्रीफ यांनी ​गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी दिलेला निकाल आम्ही स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे. तसेच या निवडणुकीत महायुतीमध्ये शेवटपर्यंत सुरू असलेली भांडणे आणि त्यानंतर झालेली युती कदाचित लोकांना आवडलेली नसावी.बाद झालेली मतेही लक्षणीय असल्याचंही त्यांनी सांगितलं.

गोकुळच्या या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन त्यांनी केलं आहे. तसेच गोकुळ दूध संघाचे नवीन संचालक मंडळ कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कुटुंबांचे कल्याण साधेल अशा शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यांनी सबंध कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणाच्या भूमिकेतून गोकुळ दूध संघाच्या उत्कर्षासाठी लागेल ते सहकार्य करण्याचंही आश्वासनही वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे.

Gokul Election; Hasan Mushrif
Gokul Election Result : मोठी बातमी! शौमिका महाडिक पराभूत, 'गोकुळ'मध्ये धक्कादायक निकाल, सतेज पाटलांची बाजी!

कोल्हापूर जिल्ह्यामधील गोकुळच्या निवडणुकीत विशेष म्हणजे तीन कॅबिनेट मंत्री, दहा आमदार आणि दोन खासदार अशी महायुतीच्या बाजूनं दिग्गज नेत्यांची फौज उतरली होती. तसेच मुंबईतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तगडी फिल्डिंग लावली होती. मात्र, एवढी ताकद लावूनही काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी काँग्रेस प्रणित आघाडीनं गोकुळच्या निवडणुकीमध्ये महायुतीला पराभवाचा धक्का देत विजय खेचून आणला आहे.

काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी गोकुळची यंदाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. ते स्वत: दोन महिन्यांपासून गोकुळच्या निवडणुकीचा वनमॅन शो प्रचाराची धुरा आणि रणनीती सांभाळत होते. अखेर सतेज पाटलांनी गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला धोबीपछाड देत 25 पैकी 13 जागा जिंकल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे गोकुळमधील मातब्बर नेत्यांना पराभव सहन करावा लागला असून महायुतीनं 12 जागा निवडून आणता आल्या आहेत.

Gokul Election; Hasan Mushrif
Gokul Election Results: निवडणुकीआधी 'खासगीकरणा'चा बॉम्ब, सतेज पाटलांनी 'गोकुळ'मध्ये महायुतीचा टांगा पलटी करताच जानकरांचं मोठं विधान, केलं सावध

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com