नवख्या आवताडेंच्या मदतीला धावले देवेंद्र फडणवीस!

मंगळवेढ्यातील अवैध धंद्यांच्या प्रश्नावर आवताडे यांच्याबरोबर फडणवीसांनी केले पोलिस प्रशानावर प्रहार
Devendra Fadnavis-Samadhan Avtade

Devendra Fadnavis-Samadhan Avtade

sarkarnama

Published on
Updated on

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनी सोमवारी (ता. २७ डिसेंबर) मंगळवेढा तालुक्यातील अवैध धंद्यांचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करत पोलिस अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. मात्र, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे पोलिस अधिकाऱ्यांची पाठराखण करत असल्याचे पाहून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नवख्या आवताडे यांच्या मदतीला धावले. फडणवीस यांनी आवताडे यांची बाजू लावून धरत मंगळवेढा तालुक्यातील अवैध धंद्यांवरून विधानसभेत पोलिस प्रशासनावर जोरदार प्रहार केला.

मंगळवेढा शहर व तालुक्यात जवळपास 800 पेक्षा अधिक अवैध व्यवसाय सुरू आहेत. त्यात दारू, जुगार, मटका, गुटखा,अवैध वाहतूक, वाळूचोरी आदींचा समावेश आहे. या अवैध धंदेवाल्यांकडून महिन्याला हप्ता गोळा केले जातो. यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी व त्यांचे कर्मचारी सहभागी असल्याचा गंभीर आरोप समाधान आवताडे यांनी आज विधानसभेत बोलताना केला. पोलिसांचे अवैध व्यवसायिकांशी असलेल्या आर्थिक लागेबांदीमुळेच अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईस गेलेल्या पोलिसाला आपला जीव गमवावा लागला, याचाही उल्लेख आवताडेंनी आपल्या भाषणात केला. पण, विधीमंडळ कामकाजात नवखे असलेले आमदार आवताडे यांच्या प्रश्नावर गृहराज्यमंत्री देसाई हे पोलिस अधिकाऱ्यांना पाठीशी घालत उत्तर देत असतानाच आमदार आवताडे यांच्या मदतीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस धावून आले आणि त्यांनी आवताडेंची पाठराखण करत मंगळवेढ्यातील अवैध धंदे आणि पोलिस प्रशासनावर टीका केली.

Devendra Fadnavis-Samadhan Avtade

पाबळमध्ये पोचताच पवारांनी काढली बापूसाहेब थिटेंची आठवण!

मंगळवेढा तालुक्‍यातील अवैध धंद्याबाबत आपण स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे तक्रार केली असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. तसेच मंगळवेढ्यातील अवैध धंद्यांबाबत त्यांनी जोरदार प्रहार केला. गृहराज्यमंत्री देसाई यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची पाठराखण करीत उपविभागीय पोलिस अधिकारी ह्या नव्याने आल्या आहेत. अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी त्यांनी पदभार घेतला आहे. तरीसुद्धा ऑक्टोबरमध्ये 619 व नोव्हेंबरमध्ये 672 अवैध व्यवसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत, त्यामुळे ते गुन्हेगारी व्यवसायिकांना पाठीशी घालत आहेत, असे म्हणता येणार नाही, असे सांगितले.

Devendra Fadnavis-Samadhan Avtade

घरात दोनशे कोटींची कॅश ठेवून जैन फिरायचे जुन्या स्कूटरवर!

त्यासंदर्भात यापूर्वी चौकशी करण्यात आली आहे, त्या चौकशीत काही सिद्ध झालेले नाही. तरीदेखील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगत सोलापूर परिसरात दौऱ्यावर गेल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याला भेट देणार असल्याचे सूतोवाच देसाई यांनी या वेळी केले.

Devendra Fadnavis-Samadhan Avtade

रामदास कदमांनी परबांसोबतचा फोटोही टाळला

मंत्रीच अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देणार असतील तर या प्रकरणाची निष्पक्ष कशी होणार, असा सवाल विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी उपस्थित केला. एकंदरीत आमदार आवताडे यांनी अवैध धंद्यांवर प्रश्न उपस्थित केला असला तरी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनीदेखील तितक्याच ताकदीने विधानसभेत त्यांना पाठबळ दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com