Madha Loksabha : माढ्यात ट्विस्ट, धैर्यशील मोहिते पाटलांच्या उमेदवारी अर्जावर हरकत

Loksabha Election : रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले. शरद पवारांची भेट घेत त्यांच्या पक्षात प्रवेशदेखील केला.
 ranjitsingh naik nimbalkar dhairyasheel mohite patil
ranjitsingh naik nimbalkar dhairyasheel mohite patilsarkarnama

Madha Political News : माढा लोकसभा मतदारसंघात नवीनच ट्विस्ट निर्माण झाला आहे. धैर्यशील मोहित पाटील यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी हरकत घेतली आहे. नोकरीचा तपशील धैर्यशील मोहित पाटील यांनी भरला नसल्याने रणजितसिंह निंबाळक यांची हरकत आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे मोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

 ranjitsingh naik nimbalkar dhairyasheel mohite patil
Uttam Jankar : धैर्यशील मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल झाला तर...; उत्तम जानकरांचा वेळापुरातून सरकारला इशारा

रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपकडून (bjp) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले. शरद पवारांची भेट घेत त्यांच्या पक्षात प्रवेशदेखील केला. आपले राजकीय विरोधक उत्तम जानकर (Uttam Jankar) यांच्याशी हातमिळवणी करत धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपली बाजू भक्कम बनवली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्जदेखील दाखल केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभय जगताप यांनी दंड थोपटले होते. ते उमेदवारी दाखल करण्याच्या मनस्थितीमध्ये होते. त्यांचे बंड शमविण्यात शरद पवार गटाला यश आले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढल्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बाजूने गोष्टी घडत असताना भाजप उमेदवार रणजित निंबाळकर यांनी घेतलेल्या आक्षेपाला ते कसे उत्तर देतात, याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com