Rajendra Mirgane News : बार्शीच्या राजेंद्र मिरगणेंवर भाजपने सोपवली महत्त्वपूर्ण जबाबदारी

Housing Ministry Advisor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नानुसार प्रत्येकाला पक्की घरे देण्याचा सरकारचा निर्धार आहे, त्याला गती येण्यासाठी राज्य सरकारकडून मिरगणे यांना गृहनिर्माण मंत्रालयाच्या सल्लागारपदी नेमण्यात आले आहे.
Rajendra Mirgane
Rajendra Mirgane Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 21 March : भारतीय जनता पक्षाचे बार्शी तालुक्यातील नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय राजेंद्र मिरगणे यांची गृहनिर्माण मंत्रालयाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गरिबांना परवडणारी घरे निर्माण करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत आहेत. त्याबाबत मिरगणे यांच्या अनुभवाचा फायदा घेण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे.

राजेंद्र मिरगणे (Rajendra Mirgane) यांनी यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नानुसार प्रत्येकाला पक्की घरे देण्याचा सरकारचा निर्धार आहे, त्याला गती येण्यासाठी राज्य सरकारकडून मिरगणे यांना गृहनिर्माण मंत्रालयाच्या (Housing Ministry) सल्लागारपदी नेमण्यात आले आहे.

Rajendra Mirgane
Mahavikas Aghadi Dispute : महाविकास आघाडीत वाद पेटला; मिरजेतील ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार

गृहनिर्माण मंत्रालयाच्या सल्लागारपदी राजेंद्र मिरगणे यांची नियुक्ती ही तीन वर्षांसाठी असून, हे अशासकीय पद आहे. गृहप्रकल्पाचा अभ्यास करून काळानुरूप त्यात बदल करण्याची आणि सुचवण्याची जबाबदारी मिरगणे यांच्याकडे असणार आहे. मिरगणे यांचा मागील सरकारमधील अनुभव गृहनिर्माण मंत्रालयासाठी घेण्याचा प्रयत्न या सरकारकडून होताना दिसत आहे.

गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत, तांत्रिक आणि आर्थिक बाबतीत सुलभता यावी, यासाठीही हे पद निर्माण करण्यात आले आहे. त्यानुसार मिरगणे हे घराची रचना आणि इतर तांत्रिक बाबतीत गृहनिर्माण विभागाला सल्ला देण्याचे काम करणार आहेत. परवडणाऱ्या घरांची निर्मिती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

Rajendra Mirgane
Vasant More News : 'इस शहर में दबदबा है हमारा...'; वसंत मोरेंचा नेमका कुणाला इशारा ?

दरम्यान, राजेंद्र मिरगणे यांच्या नियुक्तीचा भाजप तथा महायुतीला राजकीय फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मिरगणे हे मूळचे बार्शीचे आहेत. बार्शी तालुका सोलापूर जिल्ह्यातील असला तरी तो धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे धाराशिवमधील महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फायद होऊ शकतो.

R

Rajendra Mirgane
Omraje Nimbalkar: खासदार ओमराजेंचे विरोधकांना प्रत्युत्तर; एका फोनवर मी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com