Mohite Patil : धैर्यशील मोहिते पाटलांचे 1 मंत्री, 3 खासदार, 14 आमदार अन्‌ 11 माजी आमदारांना पत्र; ‘त्या’ प्रकल्पाबाबत आक्रमक...

Ujain Dam Deta Center Project : उजनी धरणावरील प्रस्तावित एआय कॅम्पस, डेटा सेंटरच्या पाणी वापर, सांडपाणी व्यवस्थापन, जलचर परिसंस्था आणि एसएमआर अणुभट्टीच्या सुरक्षेबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकप्रतिनिधींना सरकारकडून अधिकृत माहिती मागवण्याचे आवाहन केले आहे.
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 11 October : उजनी धरणावरील नियोजित एआय कॅम्पस आणि डेटा सेंटरमुळे परिसरातील जलचर प्राण्यांच्या साखळीवर काय परिणाम होणार, पाणी वापर आदींबाबत सध्या सोलापूर जिल्ह्याला प्रश्न पडलेला आहे. एआय प्रोजेक्टसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याबाबत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आवाज उठवला असून त्यांनी उजनी लाभक्षेत्रातील एक मंत्री, तीन खासदार, 14 आमदार आणि 11 माजी आमदारांना पत्र पाठवून प्रकल्पाला लागणारे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन तसेच प्रस्तावित SMR (अणुभट्टी) संदर्भातील सुरक्षा व वैधानिक मंजुऱ्या याबाबत सरकारकडून अधिकृत माहिती मागवावी, असे आवाहन केले आहे.

ते म्हणाले, उजनी जलाशय परिसरात प्रस्तावित एआय कॅम्पस, डाटा सेंटर, ग्रीन हायड्रोजिन, फ्लोटिंग सोलार तसेच प्रस्तावित 440 मेगावॅट क्षमतेच्या KAERI SMART-C लघु मॉड्युलर अणुभट्टी (SMR) प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकरी व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यासह उजनीच्या संबंधित लाभक्षेत्रातील खासदार व आजी-माजी आमदारांना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ईमेल आणि पोस्टाद्वारे पत्र पाठवले आहे.

इंदापूरचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार ओमराजे निंबाळकर, खा. प्रणिती शिंदे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजू खरे, आमदार उत्तमराव जानकर, आमदार नारायण पाटील, आमदार अभिजीत पाटील, आमदार समाधान अवताडे, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार दिलीप सोपल, दौंडचे आमदार राहुल कुल, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, माजी आमदार संजय शिंदे, बबनराव शिंदे, राजन पाटील, प्रशांत परिचारक, जयवंतराव जगताप, श्यामल बागल, हर्षवर्धन पाटील, विनायकराव पाटील, सिद्धाराम म्हेत्रे, शहाजी पाटील, दीपक साळुंखे आदींना पत्र पाठविण्याल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी नमूद केले.

Dhairyasheel Mohite Patil
Samadhan Autade : ‘ते’ भावी दुष्काळी पाहणीसाठी बांधावर तरी आले का? : आवताडेंचा भालके-सावंतांवर निशाणा

उजनी जलाशयावर सोलापूर जिल्ह्यासह उजनीच्या संबंधित लाभक्षेत्रातील शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना, उपसा सिंचन योजना, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक नागरिकांचे जीवन मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.

प्रस्तावित प्रकल्पांना पाणी देताना त्यांना लागणारे एकूण पाणी, पाणी आरक्षण, उजनीचा भविष्यातील पाणी ताळेबंद, दुष्काळी परिस्थितीतील पाणीवाटप, विद्यमान उपसा सिंचन योजनांवरील परिणाम, पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (EIA), पर्यावरणीय मंजुऱ्या, Green Hydrogen साठी लागणारे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन तसेच प्रस्तावित SMR (अणुभट्टी) संदर्भातील सुरक्षा व वैधानिक मंजुऱ्या याबाबत सरकारकडून अधिकृत माहिती मागवावी, असे आवाहन केले आहे.

Dhairyasheel Mohite Patil
Satara Dcc Bank : मकरंदआबांच्या बालेकिल्ल्यात जयकुमार गोरेंनी डाव टाकला; खंडाळ्यातून DCCसाठी माजी Zp उपाध्यक्षांना उतरविले मैदानात, प्रथमच कडवे चॅलेंज

या विषयात खासदार, सर्व आजी-माजी आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी सरकारकडून माहिती मिळवून तिचा पाठपुरावा करावा. प्राप्त वस्तुस्थिती आपल्या मतदारसंघातील नागरिक व शेतकऱ्यांसमोर मांडावी, असे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com