

Mangalvedha, 11 October : मंगळेवढा तालुक्यात दुष्काळाची भीषण समस्या सुरू असताना महायुतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या दोन भावी आमदाराचा नामाउल्लेख टाळत ते भावी दुष्काळ पाहणीसाठी बांधावर तरी आले का? असा सवाल आमदार समाधान आवताडे यांनी केला.
भगीरथ भालके यांनी 2024 मध्ये काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत तब्बल एक लाख 17 हजार मते त्यांना पडली होती. निवडणूक झाल्यापासून भगीरथ भालके लोकांच्या संपर्कात पाहिजे, तेवढ्या प्रमाणात नाहीत. तिसऱ्या क्रमांकावर असलेले अनिल सावंत हेही मतदारसंघामध्ये ठराविक वेळीच दिसून येतात.
सध्या तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आषाढी दौऱ्यात तालुक्यात दुष्काळ जाहीर करून उपाययोजना करावी, अशी मागणी केली होती. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. सावंत हे आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असल्याचे संकेत यापूर्वीच मनसेचे दिलीप धोत्रे यांनी दिले आहेत.
दुसऱ्या बाजूला भालके हेही उमेदवार असू शकतात. भालके स्वतः लढले नाही तरी त्यांच्या पत्नी पंढरपूरच्या नगराध्यक्षा आहेत, त्यामुळे डाॅ प्रणिता भालकेदेखील उमेदवारीच्या दावेदार आहेत. मात्र, सध्या हे दोघे सत्तेत असलेल्या पक्षात आहे. पण त्याचा फायदा मतदारसंघातील दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना होत नाही. खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघात दुष्काळाची पाहणी केली.
काँग्रेसचे पदाधिकारी सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रश्नांवर आवाज उठवून सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्या काही आंदोलनाला यशही मिळाले. मात्र, अद्यापही दुष्काळी उपाय योजना झालेल्या नाहीत.
केंद्रीय पथकाने मंगळवेढा तालुक्यात दुष्काळाची पाहणी केली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ होण्यास जवळपास महिन्याचा कालावधी लागेल, असे संकेत केंद्रीय पथकांनीच दिल्यामुळे गेली चार महिन्यांपासून दुष्काळाने होरपळलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना नेमका दिलासा कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी माध्यमांशी बोलताना काही आजी आणि भावी आले, पण चेष्टा करून गेले. चेष्टा करण्याची ही वेळ नाही, असे म्हणत भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्यावर केलेली टीका ही सध्या तालुक्यात चर्चेची ठरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.