Dhananjay Mahadik: कोल्हापूर महापालिकेत ताराराणी आघाडीला मोठा धक्का; धनंजय महाडिकांनी दिले संकेत

Kolhapur Municipal Corporation News: कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद आणि सहकारी संस्थांवर ताराराणी आघाडीचा झेंडा फडकला होता. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याच महाडिक पॅटर्नमुळे ताराराणी आघाडीचे वर्चस्व जिल्ह्यात पाहायला मिळत होते.
Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी एकत्र महायुती सामोरे जाणार आहे. याच महायुतीचा घटक असणारी व मागील महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल 19 जागांवर विजय मिळवणारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी स्थापन केलेली ताराराणी आघाडी यंदाच्या निवडणुकीत रणांगणात असणार का याबाबत उत्सुकता लागून राहिली होती.

भाजपकडून ताराराणी आघाडीला किती जागा दिल्या जातील? याची देखील चर्चा होती. मात्र याची चर्चा आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कारण राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी ताराराणी आघाडी बद्दल महत्त्वाचे आणि मोठे संकेत दिले आहेत.

कोल्हापूर (Kolhapur) महानगरपालिकेच्या निवडणुकीत कारण आणि आघाडी ही रणांगणात असेल का या प्रश्नावर बोलताना महाडिक यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून सामोरे जाणार आहोत. शत-प्रतिशत ताराराणी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात असेल असे सांगता येत नाही.

भाजप म्हणूनच आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. पण गरज पडल्यास काही ठिकाणी ताराराणी आघाडी देखील असू शकते. मात्र, याची शक्यता कमीच असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले.

Dhananjay Mahadik
Ram Shinde Vs Rohit Pawar : कर्जत नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत राडा; राम शिंदेंच्या समर्थकांनी रोहित पवारांच्या प्रतिनिधींना भर सभेत धुतले!

याच ताराराणी आघाडीची कोल्हापूर जिल्ह्यावर एकेकाळी सत्ता होती. कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद आणि सहकारी संस्थांवर ताराराणी आघाडीचा झेंडा फडकला होता. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याच महाडिक पॅटर्नमुळे ताराराणी आघाडीचे वर्चस्व जिल्ह्यात पाहायला मिळत होते.

2005 मध्ये ही ताराराणी आघाडी विसर्जित करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा 2016 च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत याच ताराराणी आघाडीने भाजपसोबत एन्ट्री केली. तब्बल 19 नगरसेवक निवडून आले होते.

Dhananjay Mahadik
Ranjan Taware : ‘माळेगाव’ची मागील निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे हरलो होतो; आता खबरदारी घेतलीय, रंजन तावरेंनी सांगितले मागील पराभवाचे कारण

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील माजी नगरसेवकांचा एक गट येत्या रविवारपर्यंत शिवसेनेत प्रवेश करणार आहे. एकूण 35 जणांची यादी असून त्यापैकी टप्प्‍याटप्प्याने प्रवेश होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार असून देशमुख यांच्यासह जवळपास 12 माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी पक्षप्रवेश करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com