Dhananjay Mahadik Latest Update : महाडिक थेट बोलले नाहीत पण, त्यांनी कोल्हापूरसह काँग्रेसच्या उमेदवारांना दिला इशारा

Dhananjay Mahadik kolhapur lok Sabha Situation : यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची एकही जागा राज्यात निवडून येणार नाही, अशी टीका धनंजय महाडिक यांनी केली आहे.
Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikSarkarnama

Kolhapur loksabha Latest News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सडकून टीका केली आहे. राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. उमेदवारी जाहीर होण्यास वेळ होत असला तरी योग्य आणि पंतप्रधान मोदींच्या कामावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांच्या जिवावर ज्या जागा आल्या ते आता भाजपमध्ये आहेत. त्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची एकही जागा राज्यात निवडून येणार नाही, अशी टीका धनंजय महाडिक यांनी केली आहे.

हातकणंगले आणि कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्ये जागावाटपाबाबत बोलताना, सद्यःस्थितीला कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे (shivsena) आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उमेदवारी दिल्याचे संकेत खासदार संजय मंडलिक माध्यमांना सांगत आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान ज्यावेळी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या वेळी पदाधिकाऱ्यांनी दोनपैकी एक मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा असा दावा केला होता.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप घराघरात पोहोचण्यासाठी एक जागा भाजपकडून लोकसभा लढवण्याची पदाधिकाऱ्यांची भूमिका होती. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठीकडून अद्याप कोणतीही माहिती आम्हापर्यंत पोहोचलेली नाही, असे सांगत जर पक्षाने आदेश दिला तर शौमिका महाडिक हातकणंगलेच्या निवडणूक (Election) रिंगणात असतील, असे सूचक विधान महाडिक यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या उमेदवारीवर बोलताना, उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत वरिष्ठांचा निर्णय असणार आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. महाराजसुद्धा आज मोठी रॅली काढत आहेत, कदाचित त्यांना उमेदवारीची संकेत मिळाले असतील.

Dhananjay Mahadik
Uddhav Thackeray News: काँग्रेसच्या नाकावर टिच्चून ठाकरेंनी टाकला डबल केसरी डाव; विशाल पाटलांनी दिल्ली गाठली...

महायुतीतील उमेदवारीची घोषणा उद्या होईल

तिन्ही पक्षांचे एकमत झाल्यानंतरच उमेदवारी घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तीन पक्ष असल्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यास वेळ झाला हे आम्हाला मान्य आहे. उद्या महाराष्ट्रातील सर्वच उमेदवार जाहीर होतील, अशी शक्यता असल्याचे महाडिक यांनी सांगितले. महायुतीचे (Mahayuti) उमेदवार घोषित झाल्यानंतर सर्वपक्षीयांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातच आमची प्रचाराची रणनीती ठरवणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पश्चिम महाराष्ट्रात दोन सभा घेण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

दरम्यान, वंचित आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) बाबत बोलताना, वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रात ताकद आहे हे नाकारता येणार नाही. मात्र, त्यांना आता सन्मानपूर्वक जागा मिळालेल्या नाहीत ते आता एकटे लढणार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) हातकणंगलेमध्ये त्यांची निर्णायक मते दिसली आहेत. सध्या त्यांनी एकटे जाण्याचा निर्णय घेतला असला तरी वरिष्ठ पातळीवर काँग्रेसला (Congress) काही जागांवर पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे भाजपलादेखील काही जागांवर त्यांनी पाठिंबा द्यावा. असा खोचक सवाल खासदार महाडिक यांनी करून शेवटी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. शिवाय बहुजन आघाडीचा दोन्हीही मोठ्या आघाड्यांना फटका बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सांगलीतून संजय काका पाटील (Sanjay Patil) हे एकतर्फी सांगलीतून निवडून येतील. सांगलीत महाविकास आघाडीमध्ये गोंधळ सुरू आहे. त्यांच्यात समन्वय नाही. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चंद्रहार पाटलांना (Chandrahar Patil) उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादीचे (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) नेते भूमिका तिथे काय घेणार हे निवडणुकीच्या काळात दिसेल, असेही महाडिक म्हणाले.

Edited By : Rashmi Mane

R

Dhananjay Mahadik
Satara Loksabha Election 2024 : अजित पवार सोडणार का बालेकिल्ल्यावरील हक्क..? साताऱ्याचा आज फैसला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com