Indian Defence Budget : भारतानं 'ऑपरेशन सिंदूर'नंतर कुरापती पाकिस्तानविरुद्ध उचललं मोठं पाऊल; संरक्षण बजेटमध्ये तब्बल 50 हजार कोटींची वाढ?

Proposal to increase Defense budget : अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पात सशस्त्र दलांसाठी विक्रमी तब्बल 6.81 लाख कोटी रुपयांचं बजेट जाहीर केलं होतं. आता एकाच वर्षात दुसर्‍यांदा तब्बल 50 हजार कोटींच्या वाढीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडून केंद्र सरकारकडे आला आहे.
Rajnath Singh Reaction on Union Budget
Rajnath Singh Reaction on Union BudgetSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : पहलगाममधील दहशतवादी हल्ला भारताच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्याचमुळे या हल्ल्याचा पडद्यामागचा 'मास्टरमाईंड' असलेल्या पाकिस्तानविरोधात अनेक कठोर निर्णय घेत त्यांना जेरीस आणले होते. यानंतर भारताच्या तिन्ही सैन्य दलानं पाकिस्तानमध्ये घुसन थेट 'ऑपरेशन सिंदूर'ही (Operation Sindoor) राबवलं होतं. आता या मोहिमेनंतर पाकविरुद्ध आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार भविष्यातील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा धोका ओळखून संरक्षण बजेटमध्ये (Indian Defence Budget) 50 हजार कोटी रुपयांची वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयानं सरकारकडे पाठवला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्रालयाचं हे मोठं पाऊल असणार आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिलला करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध मोठ्या प्रमाणात ताणले गेले आहेत.पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि आगामी काळात पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी जोरदार पावले उचलण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या आर्थिक बजेटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासंदर्भातला हा संरक्षण मंत्रालयाचा प्रस्ताव अतिशय महत्त्वाचं निर्णय मानला जात आहे.

Rajnath Singh Reaction on Union Budget
Gulabrao Patil: शिंदेसेना ही 'लोफरांची'? राऊतांच्या आरोपावर गुलाबराव भडकले; म्हणाले, 'कावळ्याचं बसणं अन् फांदीचं तुटणं...'

मंत्री राजनाथ सिंह यांच्या संरक्षण खात्यानं बजेटमध्ये 50 हजार कोटी रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती सरकारमधील विश्वसनीय सूत्रांच्या दाखल्यानं मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.

संरक्षण मंत्रालय या निधीचा वापर आधुनिक शस्त्रास्त्र,दारूगोळा आणि तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी वापरु शकते. तसेच तिन्ही सैन्यदलाच्या महत्त्वाच्या आवश्यकता,संशोधन यांसह विकासावर खर्च केले जाऊ शकतात. याद्वारे देशाचं संरक्षण खातं आणखी मजबूत करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे.

Rajnath Singh Reaction on Union Budget
Rajnath Singh : नाश्त्याला वेळ लागतो तेवढ्या वेळात शत्रुचा सुपडासाफ केलात..., भूज एअरबेसवर जाऊन राजनाथ सिंहांनी थोपटली सैनिकांची पाठ

अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पात सशस्त्र दलांसाठी विक्रमी तब्बल 6.81 लाख कोटी रुपयांचं बजेट जाहीर केलं होतं. आता एकाच वर्षात दुसर्‍यांदा तब्बल 50 हजार कोटींच्या वाढीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडून केंद्र सरकारकडे आला आहे.

जर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला तर सरकारच्या एकूण बजेटपैकी 5 लाख कोटी रुपयांहून अधिक होणार आहे. जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश असलेल्या भारताचा लष्करी खर्च 2024 मध्ये 1.6 टक्के वाढ होत 7.19 लाख कोटींवर पोहचला आहे. तर पाकिस्तानचा लष्करी खर्च अंदाजे 85 हजार 170 कोटी होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com