Dilip Mane : दिलीप मानेंनी ‘दक्षिण सोलापूर’साठी शड्डू ठोकला; काँग्रेसकडे उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल!

Assembly Election 2024 : सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर मतदारसंघासाठी माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसकडे रीतसर उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला आहे.
Dilip Mane
Dilip ManeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 16 July : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर मतदारसंघासाठी माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसकडे रीतसर उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला आहे. माने यांचे स्वीय सहाय्यक शिवाजी घोडके यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर मतदारसंघावर माने यांनी रितसर दावा केला आहे. आता इतर इच्छुकांच्या हालचालीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या (Solapur Lok Sabha Constituency) निवडणुकीत भाजपचे आमदार असलेल्या सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 9 हजार 436 मतांचे लीड मिळाले होते. त्यामुळे दक्षिण सोलापूरसाठी (South Solapur) काँग्रेसकडे इच्छुकांची सर्वाधिक संख्या आहे. यात माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane), काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, मागील विधानसभा निवडणूक ‘दक्षिण’ मधून लढवणारे सोलापूर महापालिकेचे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, उद्योजक महादेव कोगनुरे, बाळासाहेब शेळके यांच्या नावाची चर्चा हेात आहे.

माजी आमदार दिलीप माने यांनी 2009 ते 2014 या कालावधीत दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मागील निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेस पक्षाशी पुन्हा जुळवून घेतले. त्यानंतर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश केला. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी उमेदवारी मागणीचा अर्ज केल्याने त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे.

दिलीप माने हे भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या तोडीस तोड उमेदवार मानले जातात. दिलीप माने यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली एक तुल्यबळ लढत दक्षिण सोलापूर मतदारसंघात पाहायला मिळू शकते. सर्वाधिक इच्छूक असलेल्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवते हे पाहावे लागेल.

Dilip Mane
Dada Bhuse On Chhagan Bhujbal : भुजबळांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर दादा भुसेंनी व्यक्त केली नाराजी

शिंदेंची भूमिका महत्वाची ठरणार

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार दिलीप माने यांनी उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला आहे. मात्र, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदरारसंघाचा उमेदवार ठरविण्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांची भूमिका निर्णायक असणार आहे. दक्षिण सोलापूरच्या उमेदवारीची माळ ते नेमके कोणाच्या गळ्यात घालतात, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

इच्छुकांसाठी 20 हजारांचे डिपॉझिट

सोलापूर शहर काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागविले जात आहेत. सुमारे 20 हजार रुपयांचे डिपॉझिट या अर्जासाठी पक्षाकडून ठेवण्यात आले आहे. इच्छूक वीस हजार रुपये डिपॉझिट भरून ते निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या मतदारसंघात उमेदवारी मागू शकतात. इच्छुकांचे हे अर्ज सोलापूर काँग्रेसकडून वरिष्ठ कमिटीकडे पाठविण्यात येणार आहेत.

Dilip Mane
Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीसाठी प्रथमच मंत्र्यांची समन्वय समिती; चंद्रकांत पाटलांसह तिघांचा समावेश...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com