Dada Bhuse On Chhagan Bhujbal : भुजबळांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर दादा भुसेंनी व्यक्त केली नाराजी

Maratha Reservation Issue : दादा भुसे यांनी मराठा आरक्षण विषयावर सरकारची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू मांडली.
Dada Bhuse-Chhagan Bhujbal-Eknath Shinde
Dada Bhuse-Chhagan Bhujbal-Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Nashik, 16 July : मराठा आरक्षणाचा विषय राज्यात चांगलाच तापला आहे. या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवरून विविध मतप्रवाह निर्माण झाले आहेत.

मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोमवारी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावरून वातावरण बिघडले आहे. असा दावा भुजबळ यांनी केला होता.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना या विषयात फारसे समजत नाही, त्यामुळे हा विषय सोडविण्यासाठी पवार यांनी पुढाकार घ्यावा. राज्य सरकारशी चर्चा करावी, असे भुजबळ यांनी म्हटल्याचे माध्यमांतून प्रसिद्ध झाले होते.

या विषयावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी भुजबळ यांच्या भेटीबाबत जर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाबाबत काहीच समजत नाही, असे वक्तव्य केले असेल तर ते अयोग्य आहे. असे अपेक्षित नाही, अशी नापसंती व्यक्त केली.

राज्य सरकारने या विषयावर विविध निर्णय घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यातून सरकारचा प्रामाणिकपणा स्पष्ट होतो.

शासकीय नोकऱ्यांमध्ये देखील मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ व्हावा, यासाठी वेळोवेळी अध्यादेश काढण्यात आले आहेत. यातील काही निर्णयांना स्थगिती मिळावी, यासाठी विविध याचिका न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्या देखील न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

Dada Bhuse-Chhagan Bhujbal-Eknath Shinde
Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीसाठी प्रथमच मंत्र्यांची समन्वय समिती; चंद्रकांत पाटलांसह तिघांचा समावेश...

राज्य सरकारच्या सर्वेक्षणानुसार मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करणारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ते न्यायालयात सादर करण्यात आले आहे. या सर्व प्रक्रियेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. असे असताना या प्रश्नात मुख्यमंत्री शिंदे यांना काही समजत नाही, असे विधान करणे योग्य नाही.

मंत्री भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेण्यात काहीही गैर नाही. मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा करून तो सोडविण्यासाठी त्याचा फायदा झाल्यास ते चांगलेच होईल. मात्र, या संबंध प्रक्रियेत मुख्यमंत्री शिंदे यांना काहीच समजत नाही, असे कोणी म्हणत असेल तर ते आम्हाला मान्य होणार नाही. या शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Dada Bhuse-Chhagan Bhujbal-Eknath Shinde
Mukesh Sahani Father Murder : खळबळजनक! माजी मंत्र्याच्या वडिलांची धारदार शस्त्रानं हत्या, छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com