Solapur Shivsena : सोलापुरात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शहर समन्वयक, उपजिल्हाप्रमुखांसह 11 पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Shivsena's 11 Office Bearers Resign : शिवाजी सावंत यांच्यानंतर सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख महेश साठे यांच्यावर आरोप करत आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे शिंदेसेनेतील वाद वाढण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 02 August : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षांतर्गत वादाचा उद्रेक झाला असून सोलापूर शहरातील तब्बल अकरा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, त्यानंतर आज पुन्हा एकदा धक्का बसला आहे. या राजीनामा सत्रामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील बंडाळी चव्हाट्यावर आली आहे.

शिवसेनेचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख महेश साठे यांच्यावर आरोप करत सोलापूर शिवसेनेतील (Solapur Shivsena) अकरा पदाधिकाऱ्यांनी हे राजीनामे दिले आहेत, त्यामुळे सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना (Shivsena) सोलापूर शहर समन्वयक दिलीप कोल्हे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख आशिष परदेशी, सोशल मीडिया शहर प्रमुख सागर शिंदे, वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख जवाहर जाजू , युवासेना उपशहर प्रमुख मयूर झांबरे, नवनाथ भजनावळे, राहुल काटे यांच्यासह अकरा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनीही पक्षाच्या कामकाजात आपल्याला विश्वासात घेतले जात नाही. माझ्या माढा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकाही माझ्या परस्पर करण्यात येत आहेत. पक्षाच्या नेतृत्वाचा माझ्यावर आता विश्वास राहिला नाही, त्यामुळे मी संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा देत आहे, असे सांगून शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होतो.

Eknath Shinde
Sanjay Raut speech : राज्य सरकारच्या विरोधात बोलले तर जेलमध्ये टाकले जाते; संजय राऊत यांची टीका

राजीनामा देताना सावंतांनी महेश साठे यांचे नाव घेतले नव्हते. मात्र, सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांनी महेश साठे यांच्यावर आरोप केले आहेत सोलापूर शहरातील शिवसेनेच्या कामात महेश साठे यांच्यासह इतर पदाधिकारी हस्तक्षेप करत आहेत. परस्पर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. त्यांच्या हस्तक्षेपामुळे सोलापुरात शिवसेनेची वाताहत होत आहे, असा आरोप माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी केला.

दिलीप कोल्हे म्हणाले, आम्ही अकरा जणांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. यापुढील काळात आम्ही शिवसैनिक म्हणून काम करणार आहोत. पुढील राजकीय दिशा ठरविण्यासाठी येत्या चार दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. शिवसेनेतील राजीनाम्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत.

Eknath Shinde
Dattatray Bharne : थोरल्या साहेबांचा आदेश पण अजितदादांनी रिस्क घेतली... भरणेमामांनी ती निवडणूक लढवलीच!

शिवाजी सावंत यांच्यानंतर सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख महेश साठे यांच्यावर आरोप करत आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे शिंदेसेनेतील वाद वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com