Teacher Constituency Election : शिक्षकांनो लक्ष द्या! शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतदार नोंदणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वाचे आदेश

Voter Registration News : पुढील काही महिन्यात होणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकांबाबत प्रशासन पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एक बैठक घेत महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.
Teacher Constituency Election
Teacher Constituency Electionsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणीसंबंधी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.

  2. जिल्ह्यातील पदवीधर, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी नोंदणी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  3. विलंब झाल्यास मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यास अडचण येऊ शकते, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Pune News : पुढील काही महिन्यात होणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकांबाबत राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी भाजपने आपले उमेदवार जवळपास निश्चित केले असल्याचे सांगितले जात आहे. तर मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेने देखील या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षत या निवडणुकांच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.

त्यामुळे सबंध महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकांकडे लागला आहे. अशातच या निवडणुकी संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली आणि त्यामध्ये जिल्ह्यातील पदवीधर व मान्यताप्राप्त माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी मतदार नोंदणीसाठी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीस निवडणूक उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर, तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

Teacher Constituency Election
Teachers Constituency Election 2024: शिक्षकांना पैसे वाटप करणाऱ्याला ठाकरे गटाच्या नेत्यांनी पकडले!

जिल्ह्यातील एकही शासकीय अधिकारी वा कर्मचारी पदवीधर मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी तालुकास्तरावर मिशन मोडमध्ये नोंदणी मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यासाठी प्रांताधिकारी यांनी तात्काळ तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित नोंदणी पूर्ण करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

पदवीधर मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्ष, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्था यांचे सहकार्य घेण्याचे निर्देश देत, शिक्षकांनाही पदवीधर मतदार म्हणून नोंदविण्यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची माहिती घेऊन नोंदणी करावी आणि एकही शिक्षक नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. तसेच या दोन्ही निवडणुकांसाठी मतदार नोंदणीची अंतिम तारीख सहा नोव्हेंबर ही निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे अवघ्या काही दिवसातच हे काम पूर्ण करावे लागणार आहे.

Teacher Constituency Election
Teachers constituency Election : प्रवीण गेडाम यांच्या आदेशाने मुख्याध्यापकांना फुटला घाम...काय आहे कारण?

FAQs :

1. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी कोण पात्र आहे?
मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक तसेच पदवीधर शिक्षक पात्र आहेत.

2. मतदार नोंदणीची शेवटची तारीख कोणती आहे?
अधिकृत अंतिम तारीख जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे.

3. नोंदणी कशी करायची?
शिक्षकांनी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित अर्ज ऑनलाइन किंवा निवडणूक कार्यालयात सादर करावा.

4. नोंदणी वेळेत न केल्यास काय होईल?
नोंदणी न झाल्यास मतदार यादीत नाव नोंदवले जाणार नाही आणि मतदानाचा अधिकार मिळणार नाही.

5. हा आदेश कोणत्या जिल्ह्याचा आहे?
हा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आपल्या जिल्ह्यासाठी दिला आहे, मात्र तो सर्व जिल्ह्यांसाठी लागू होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com