NCP Leader Big Statement : फाटाफूट झालेल्या नेत्यांनी एकत्र यावं; जनतेचा तसा कौल; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

Rajan Patil : आपल्यातील नेतेमंडळी आता नेमकी कुठे आहेत, हेच कळत नाही. आपल्यामध्ये फटाफूट झाली आहे, त्यामुळे कदाचित आपल्या भेटी होत नसतील.
Rajan Patil
Rajan PatilSarkarnama

Solapur, 10 June : पंढरपूर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. फाटाफूट झालेल्या नेत्यांनी आता एकत्र यावे. लोकसभा निवडणुकीत जनतेनेही तसा कौल दिला आहे, असे सांगून राजन पाटील यांनी जिल्ह्यातील नेत्यांना ऐक्याची साथ घालताना दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे, असे अप्रत्यक्ष सूचक भाष्य केले आहे.

माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil), दीपक साळुंखे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील. प्रा. डॉ. पी. बी. रोंगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (Ajit Pawar), भाजप आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाचे स्थानिक नेते उपस्थित होते

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपल्यातील नेतेमंडळी आता नेमकी कुठे आहेत, हेच कळत नाही. आपल्यामध्ये फटाफूट झाली आहे, त्यामुळे कदाचित आपल्या भेटी होत नसतील, असे विधान माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे समर्थक आणि माजी सभापती वामनराव माने यांनी केले. त्यानंतर बोलायला उठलेले माजी आमदार राजन पाटील यांनी फाटाफूट झालेल्या नेत्यांना ऐक्याची साद घातली.

सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी एकत्र काम केलेल्या नेतेमंडळींची आता भेट होत नाही. तुम्ही पण आम्हाला बोलावत नाही. लोकसभा निवडणुकीत जनतेने कौल दिला आहे, त्याप्रमाणे फटाफूट झालेल्या लोकांनी आता एकत्र आलं पाहिजे, असे वक्तव्य राजन पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला माजी आमदार पाटील यांनी केलेले हे वक्तव्य राजकीयदृष्टीने महत्वपूर्ण आहे.

Rajan Patil
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील; पोलिस हवालदार ते केंद्रीय मंत्री

माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीने जिंकले आहेत, त्या पार्श्वभूमीवर राजन पाटील यांनी केलेल्या विधानाला विशेष महत्त्व आहे. आता राजन पाटील यांचे आवाहन फाटाफूट झालेले नेते किती मनावर घेतात, हे येत्या काही दिवसांत समजणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी याच कार्यक्रमात शरद पवार गटाचे पंढरपूरमधील गणेश पाटील आणि अभिजीत पाटील यांना टोमणे मारले. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून गणेश पाटील यांची सीट निवडून आल्यामुळे ते सध्या जाम खूश आहेत. मात्र, अभिजीत पाटील खुशी दिसत नाहीत आणि नाखूषही दिसत नाहीत. सध्या त्यांचं नाव कोणत्याच यादीत नाही, असा टोला त्यांनी अभिजित पाटील यांना लगावला.

Rajan Patil
Praniti Shinde-Narsayya Adam : काँग्रेस ‘सोलापूर शहर मध्य’ आडम मास्तरांसाठी सोडणार की प्रणितींचा उत्तराधिकारी शोधणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com