Praniti Shinde-Narsayya Adam : काँग्रेस ‘सोलापूर शहर मध्य’ आडम मास्तरांसाठी सोडणार की प्रणितींचा उत्तराधिकारी शोधणार?

Solapur City Central Assembly Constituency : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसला पाठिंबा देताना माजी आमदार आडम यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघ विधानसभेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडण्यात यावा, अशी मागणी केली होती.
Narsayya Adam Master-Farooq Shabdi-Praniti Shinde
Narsayya Adam Master-Farooq Shabdi-Praniti Shinde

Solapur, 10 June : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे या 74 हजार मतांच्या फरकानी विजयी झाल्या आहेत. त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील त्यांचा उत्तराधिकारी कोण, याची चर्चा आता सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केलेला दावा खरा असेल तर काँग्रेस पक्ष सोलापूर शहर मध्य मतदारसंघ आडम मास्तरांसाठी सोडणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपच्या विजयाची हॅट्‌ट्रीक रोखताना आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांचा दणदणीत मतांनी पराभव केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam Master) यांनी इंडिया आघाडीचा घटक पक्ष या नात्याने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. पाठिंब्यासाठी खुद्द प्रणिती शिंदे ह्या आडम मास्तर यांच्या कार्यालयात गेल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला पाठिंबा देताना माजी आमदार आडम यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघ (Solapur City Central Constituency) विधानसभेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्याबाबत माकपचे सचिव सीताराम येच्युरी आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे. त्या चर्चेत काँग्रेस पक्षाने सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माकपला सोडण्याचे मान्य केले आहे, असा दावा केला होता. मात्र, काँग्रेसकडून त्यावर कोणतेही भाष्य करण्यात आले नव्हते.

प्रणिती शिंदेंच्या विजयानंतर आता सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. विधानसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा अवधी आहे. लोकसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी महाविकास आघाडीला पुन्हा एकत्रितपणे मतदारसंघाच्या वाटपाचा मुद्दा सोडवावा लागणार आहे.

Narsayya Adam Master-Farooq Shabdi-Praniti Shinde
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घ्या अन्‌ मंत्री करा; पुणे शहर राष्ट्रवादीचा ठराव

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना 90 हजार 468, तर सातपुते यांना 89 हजार 672 मते मिळाली आहेत. या मतदारसंघातून शिंदे यांना निसटते 796 मतधिक्य मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता आहे. प्रणिती शिंदे ह्या गेल्या दोन निवडणुकांत या मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत, त्यामुळे काँग्रेस शहर मध्य मतदारसंघ कम्युनिस्ट पक्षाला सहजासहजी सोडेल, अशी चिन्हे नाहीत.

खुद्द माजी आमदार आडम मास्तर यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या कार्यक्रमात याबाबतचे सूतोवाच केले होते. काँग्रेस आपल्याला सोलापूर शहर मध्य मतदार संघ सोडेल, या भ्रमांत राहू नका. या मतदारसंघातून आपल्याला स्वबळावर निवडणूक लढवायची आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून स्पष्टपणे सांगितले होते.

Narsayya Adam Master-Farooq Shabdi-Praniti Shinde
Loksabha Election Result : प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांनी उडवली भाजपची झोप

काँग्रेसकडून या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत. काँग्रेसमध्येच उमेदवारीसाठी मारामारी असताना शिंदे सोलापूर शहर मध्य माकपला खरंच सोडणार का, असा प्रश्न आहे. माकपकडून माजी आमदार आडम मास्तर हे उमेदवार असतील. मात्र, काँग्रेसमध्येच उमेदवारीसाठी मारामारी असताना हक्काचा मतदारसंघ ते आडमांना सोडतील का, याची चर्चा रंगली आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघाबाबत काँग्रेस पक्षाकडून अद्यापपर्यंत तरी कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.

‘एमआयएम’चेही शहर मध्यकडे लक्ष

लोकसभा निवडणुकीत भाजपनेही या मतदारसंघात काँग्रेसच्या बरोबरीने मते घेतली आहेत. त्यामुळे भाजप ही जागा लढवणार की मागील निवडणुकीप्रमाणे मित्रपक्षाला सोडणार, याची उत्सुकता अणार आहे. मतदारसंघातील बहुसंख्य मुस्लिम समाज लक्षात घेऊन एमआयएमचेही शहर मध्यकडे लक्ष असणार आहे. ‘एमआयएम’ने यापूर्वी या मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे, त्यामुळे ते पुन्हा एकदा चाचपणी करण्याची शक्यता आहे.

Narsayya Adam Master-Farooq Shabdi-Praniti Shinde
Loksabha Election Result : प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांनी उडवली भाजपची झोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com