Anjangaon Statue : अंजनगावातील पुतळा आमदार अभिजीत पाटलांनी स्थलांतरित होऊ दिला नाही : लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

Laxman Hake Serious Allegation On Abhijeet Patil : माढ्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे तणाव निर्माण झाला असून लक्ष्मण हाके यांनी आमदार अभिजीत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Abhijeet patil- Laxman Hake
Abhijeet patil- Laxman HakeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 02 April : माढा तालुक्यातील अंजनगाव येथील खेलोबा मंदिराच्या आवारात मध्यरात्रीच्या सुमारास बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून गावात मोठा तणाव निर्माण झाला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या छत्रपतींच्या पुतळ्याप्रकरणी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आडून एखाद्या समाजात दहशत माजविण्याचा प्रयत्न आहे, त्याला माढ्याचे आमदार अभिजीत पाटील जबाबदार आहे, असा आरोपही हाकेंनी केला.

अंजनगाव खेलोबा हे माढा तालुक्यातील तीर्थक्षेत्र असून जागृत देवस्थान आहे. लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी यात्रेला येतो. गावात ७० टक्के धनगर समाज आहे. खेलोबो देवस्थानच्या प्रवेशद्वारावर मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आलेला आहे. मुळात पुतळा बसविण्यात आल्यानंतर तुम्ही ॲक्शन मोडमध्ये येता का, असा सवाल हाके यांनी गृहविभागाला केला आहे.

लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आमचा कोणाचाही विरोध नाही. पण, धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्राच्या प्रवेशद्वारावर का बसविला जातो. पुतळा बसविणाऱ्या समाजकंटकांची काय भावना आहे. आम्ही त्याला विरोध करावा, असं त्यांना वाटतं का. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी देणारी माणसं आहोत.

ग्रामस्थ, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांरित करायचे ठरविले होते. पण आमदार आभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी पुतळा स्थलांतरित होऊ दिला नाही. त्यांनी फूस लावल्याने पुतळा तिथेच ठेवण्यात आला. पोलिसांवर दगडफेक झाली. धनगर समाजाच्या लोकांना एका समाजमंदिरात कोंडण्यात आले आणि त्यांच्यावर दगडफेक झाली, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

हाके म्हणाले, ज्या वेळी तुम्ही निवडून जाता, त्यावेळी तुम्ही कोणत्या पार्टीचे, पक्षाचे आणि जातीचे राहत नाही. त्यावेळी तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे आणि कायदेमंडळाचे सभासद असता. याची तरी चाड असली पाहिजे, या अभिजीत पाटील यांना. धनगर समाज कधीही तुमच्या आड आलेला नाही. अभिजीत पाटील यांच्यासारख्या आमदारांचा मी निषेध करतो. या घटनेमागे अभिजीत पाटील हेच आहेत.

माढा तालुक्यात ही पहिलीच घटना नाही तर १३ ते १४ वी घटना आहे. मराठवाड्यात जे जळतंय, तेच सोलापूर जिल्ह्यात करायचा प्रयत्न होत आहे आणि त्याचा मास्टर माईंड अभिजीत पाटील आहे. आमदार रोहित पवार यांची आयटी सेल आहे. त्यांच्यावर आमचा आरोप आहे, असेही हाके यांनी स्पष्ट केले.

हाके म्हणाले, त्या आवारे यांना आमचं सांगणं आहे. तुझी दोन एकर जमीन शिवसृष्टी उभारण्यासाठी द्यावी. धनगर समाज वर्गणी काढून ती उभा करेल. धनगर समाजाच्या देवस्थानावर अतिक्रमण करण्याचा हा प्रयत्न आहे. कधी वंजारी, कधी दलित तर आता धनगर समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com