Dr. Shirish Valsangarkar : आत्महत्येच्या अर्धा तास अगोदर डॉ. वळसंगकरांचा चौघांना फोन; दिवसभरात मोबाईलवर 27 कॉलची नोंद

Solapur Crime News : त्या दिवशी डॉक्टरांनी ज्यांना फोन केले आणि ज्यांचे फोन आले, त्या लोकांची चौकशी करण्यात येणार आहे, त्यानंतर तपासाला दिशा मिळेल, असा विश्वास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बोलून दाखवला
Dr. Shirish Valsangkar
Dr. Shirish ValsangrkarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 April : प्रख्यात मेंदूविकास तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येचा घटनेला आज (ता. 29 एप्रिल) बारा दिवस होऊन गेले आहेत. मात्र, पोलिस अजूनही आत्महत्येमागचे कारण शोधू शकलेले नाहीत. डॉक्टरांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून अटकेत असलेली मनीषा मुसळे-माने हीच मुख्य आरोपी वाटते. पण ते अजूनही सिद्ध झालेले नाही. आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी आत्महत्येच्या दिवशीचा डॉ. वळसंगकर यांच्या मोबाईल कॉलचा सीडीआर काढला आहे. त्यानुसार आत्महत्येच्या दिवशी म्हणजे 18 एप्रिल रोजी डॉक्टरांनी केलेले आणि त्यांना आलेल्या कॉलची संख्या तब्बल 27 असल्याचे समोर आहे. आत्महत्येच्या अर्धा तासापूर्वी त्यांनी चौघांना फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangarkar) यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तिने डॉक्टरांना दिलेल्या धमकीप्रकरणी वळसंगकर यांच्यासह त्यांची पत्नी उमा, मुलगा डॉ. अश्विन यांना मेल करून माफीनामा दिला होता. तसेच, मनीषा मुसळे माने हिला राजीनामा देण्यापासूनही डॉ. शिरीष वळसंगकर यांनीच थांबवले होते. त्यानंतर घरी गेलेल्या डॉक्टरांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली होती.

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, त्यांना कोणाचा त्रास होता का, आत्महत्येमागचे कारण पोलिसांना न्यायालयात चार्टशीट दाखल करण्यापूर्वी शोधावे लागणार आहे. त्यातूनच पोलिसांनी डॉक्टरांच्या फोन कॉल्सचा सीडीआर रिपोर्ट (CDR Report) मिळविला आहे. सध्या त्या सीडीआर तपासणी सुरू आहे.

Dr. Shirish Valsangkar
Solapur News : डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येचा उलगडा होण्याआधीच सोलापुरात आणखी एका डॉक्टराची आत्महत्या

डॉ. वळसंगकर हे दोन मोबाईल वापरत होते. एक मोबाईल ते वैयक्तीक कामासाठी तर दुसरा हॉस्पिटलमधील कामासंदर्भात होता. या दोन्ही मोबाईचा सीडीआर रिपोर्ट पोलिसांनी काढला आहे. त्यानुसार आत्महत्येच्या दिवशी म्हणजे १८ एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास रुग्णालयातून घरी आलेल्या डॉक्टरांना मनीषा मुसळे माने हिने फोन केलेला आढळून आलेला नाही. तसे तिने पोलिस कोठडीत असतानाही तपास अधिकाऱ्यांपुढे हे स्पष्ट केलेले आहे.

दरम्यान, आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांच्या मोबाईलवर आलेले आणि गेलेल्या २७ फोन कॉलची नोंद झालेली आहे. तसेच गोळी झाडून घेण्याच्या अर्धा तासापूर्वी डॉ. वळसंगकर यांनी चौघांना फोन केल्याचे समोर आले आहे. त्या दिवशी डॉक्टरांनी ज्यांना फोन केले आणि ज्यांचे फोन आले, त्या लोकांची चौकशी करण्यात येणार आहे, त्यानंतर तपासाला दिशा मिळेल, असा विश्वास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बोलून दाखवला

हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालाला दोन महिने लागणार

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या खिशात सापडलेली चिठ्ठी, तसेच त्यांची मराठीतील इतर कागदपत्रेही पुण्यातील हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात आली आहेत. त्यावरील हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवालासाठी किमान दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. या गुन्ह्याचे चार्टशीट दाखल करण्यापूर्वी हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल येणे अपेक्षित आहे.

Dr. Shirish Valsangkar
Madha News : आमसभेत गंभीर आरोप झालेल्या माढ्याच्या तहसीलदारावर अखेर निलंबनाची कारवाई

सीसीटीव्ही फुटेज ठरणार महत्वाचे

गोळी झाडून घेण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर हे अर्धा तास बेडरूममध्येच होते. या वेळी घरात आदल्या दिवशी आलेली त्यांची मुलगी नेहा आणि पत्नी डॉ उमा या दोघीच होत्या. त्या दोघी हॉलमध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. त्या वेळी घरात कोणीही नव्हते, असे डॉक्टरांच्या पत्नी उमा यांनी पोलिसांना सांगितले आहे. पण घरात खरंच तिघे होते की अन्य कोणी होते, याबाबतची खात्री पोलिस सीसीटीव्ही फूटेजवरून करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com