Kolhapur Politics : बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटलांना झटका; के. पी. पाटील लय भारी!

Dudhganga Vedganga Sahakari Sakhar Karkhana Bidri Election : बिद्री कारखान्याच्या निवडणुकीवरून कोल्हापूरचे राजकारण फिरणार...
Chandrakant patil, K.P. Patil
Chandrakant patil, K.P. PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरात मोठा झटका बसला आहे. हा झटका माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिला आहे. के. पी. पाटील यांनी बिद्री साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी जिंकली आहे. के. पी. पाटील यांच्या या यशाने आगामी विधानसभा निडणुकीत कोल्हापुरातील राजकारण रंगणार आहे.

Chandrakant patil, K.P. Patil
Lok Sabha Election : निवडणुकीआधीच कोल्हापुरात जुंपली, रिचेबल-नॉट रिचेबलचा मुद्दा गाजणार

बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी महालक्ष्मी आघाडीने दणदणीत विजय मिळवत विरोधकांना धुळ चारली आहे. महालक्ष्मी आघाडीने पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, के. पी. पाटील यांच्यासह ४ माजी आमदारांवर बळावर हा विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या दक्षिण भागात या निकाला परिणाम होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून कोल्हापुरातील राजकारण रंगले होते. जिल्ह्यातील प्रमुख आणि मातब्बर नेत्यांनी या निवडणुकीत ताकद लावली होती. यामुळे बिद्रीतील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याची ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. म्हणूनच या निवडणुकीच्या निकालाची पूर्ण जिल्ह्याला उत्सुकता होती. दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या 25 जागांसाठी ही निवडणूक झाली. या बिद्री कारखान्याने राज्यात उसाला सर्वाधिक दर दिला आहे. या कारखान्याचा सह वीज निर्मिती आणि इथेनॉल निर्मिती प्रकल्पही आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बिद्रीतील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच जागा जिंकून सत्ताधारी महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने विरोधकांना धक्का दिला. तर विरोधात असलेल्या राजर्षी शाहू विकास आघाडीचे परिवर्तनाचे स्वप्न धुळीस मिळाले.

चंद्रकांत पाटलांना मोठा धक्का!

बिद्रीतील साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली होती. निवडणुकीच्या काळात चंद्रकांत पाटील हे या भागात तळ ठोकून होते. बिद्रीतील भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला होता. पण याचा काहीही परिणाम निवडणुकीत झाला नाही. विशेष म्हणजे बिद्रीचा कारखाना चंद्रकांत पाटल्यांच्या गावाजवळचा आहे. यामुळे हा पराभव चंद्रकांत पाटलांना मोठा धक्का देणार आहे.

आमदार प्रकाश आबिटकर यांच्यामुळे कारखान्याची निवडणूक लागली. त्यांनी कारखान्याच्या लेखा परीक्षणासाठीही प्रयत्न केला. पण पालकमंत्री हसन मुश्रीप यांच्यामुळे चौकशी झाली नाही. तसेच सभासदांनी के. पी. पाटील यांना समर्थन दिले. त्यामुळे के. पी. पाटील यांचा एतर्फी विजय झाला. बिद्रीचा लय भारी कारभार, ही के. पी. पाटील यांनी दिलेली घोषणा निवडणुकीत गाजली.

Chandrakant patil, K.P. Patil
Raju Shetti : लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका .. राजू शेट्टी यांच्यासह 150 जणांवर गुन्हा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com