Awade Politics : आवाडेंची गेमचेंजर खेळी, मुली पाठोपाठ पत्नीलाही उतरवलं ZP च्या मैदानात

Zilla Parishad elections : नुकताच पार पडलेल्या महानगरपालिकेंच्या निवडणुकीत भाजपने आपल्या पक्षाच्या आमदार आमि खासदारांसह मंत्र्यांना थेट फर्माण काढत घराणेशाही थांबवण्याचे आदेश दिले होते.
Ichalkaranji Awade family; Rahul Awade's Daughter Sanika Awade And wife Mosami Awade
Ichalkaranji Awade family; Rahul Awade's Daughter Sanika Awade And wife Mosami Awadesarkarnama
Published on
Updated on
Summary
  • भाजपने महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाही थांबवण्याचे आदेश दिले होते.

  • जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र अनेक ठिकाणी घराणेशाहीला उत आल्याचे चित्र आहे.

  • इचलकरंजीत आवाडे घराण्यातील सानिका आवाडे व मोसमी आवाडे यांच्या उमेदवारीमुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

Ichalkaranji News : राज्यात नुकताच झालेल्या नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घराणेशाही दिसून आली होती. यानंतर भाजपने महानगरपालिका निवडणुकींच्या वेळी आमदार, खासदार आणि मंत्र्यांना थेट आदेश देत घरातील कोणत्याही सदस्याला उभारू नये असे बाजवले होते. ज्यानंतर विविध ठिकाणी नेत्यांच्या घरच्यांना माघार घ्यावी लागली होती. याच पद्धतीने कोल्हापुरमध्ये देखील कृष्णराज महाडिक यांनी माघार घेतली होती.

पण आता होवू घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा घराणेशाहीनं डोकं वर काढले असून इचलकरंजीमधील आवाडे घराण्याची राजकीय रणनीती पुन्हा चर्चेत आली आहे. आमदार राहुल आवाडे यांच्या मुली पाठोपाठ पत्नी मोसमी आवाडेंनी देखील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दंड थोपटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का असा सवाल करताना दिसत आहेत.

बुधवार (ता.२१) जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असतानाच मोठी झुंबड उडाली आहे. एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात उमेदवारीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच इचलकरंजीमध्ये मात्र घराणेशाहीला उत आला आहे. येथे आवाडे घराण्याची चौथी पिढी आता राजकारण उतरली असून आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे यांनी ZP च्या मैदानात पाय ठेवले आहेत.

Ichalkaranji Awade family; Rahul Awade's Daughter Sanika Awade And wife Mosami Awade
Zilla Parishad Elections : ऐन रणधुमाळीत भाजपला कोंडीत टाकणारा काँग्रेसचा निर्णय, स्वाभिमानीशी गट्टी करत युती घोषणा; शिरोळचे राजकीय गणितं बदलणार?

आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. बुधवारी (ता. २१) त्या हातकणंगले तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे एकीकडे उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. अशातच दुसरीकडे आमदार राहुल आवाडे यांच्या पत्नी मोसमी आवाडे यांनी रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला.

इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय असलेल्या मोसमी आवाडे यांनी थेट जिल्हा परिषद निवडणुकीत उडी घेतल्याने आता राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. रेंदाळ मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार शिवाजी मुरलीधर जाधव यांनीही आज अर्ज दाखल केला आहे. अशा स्थितीत भाजप आमदार राहुल आवाडे यांच्या पत्नीनेच अपक्ष उमेदवारी अर्ज केल्याने महायुतीतच गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्या भाजपचे आमदार असणारे आमदार राहुल आवाडे स्वतः याच रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांचे या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघावर वर्चस्व असून तो अबाधित ठेवण्यासाठीच राहुल आवाडे यांनी राजकीय खेळी खेळल्याची चर्चा आहे. पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय हेतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

घरात आमदार खासदार...

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे आणि वजनदार घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'आवाडे' घराण्यात कल्लाप्पाण्णा आवाडे हे माजी खासदार असून प्रकाश आवाडे माजी आमदार आहेत. तर आता विद्यमान आमदार हे राहुल आवाडे आहेत. आता त्यांची मुलगी सानिका आवाडे ही राजकारणाच्या मैदानात उतरत असून त्या कुटुंबातील चौथी पिढी ठरतील. तसेच आता त्यांच्या पत्नी देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावणार असून मतदार राजा त्यांना विजयी करतो का हे पाहावं लागेल.

Ichalkaranji Awade family; Rahul Awade's Daughter Sanika Awade And wife Mosami Awade
Zilla Parishad elections : मतदान सुरू असतानाच भाजपने डाव टाकला; कोकणात अजितदादांसह शिंदेंना धक्का

FAQs :

1) भाजपने घराणेशाहीबाबत कोणते आदेश दिले होते?
महानगरपालिका निवडणुकीत आमदार, खासदार व मंत्र्यांना घराणेशाही थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते.

2) सानिका आवाडे यांनी कोणत्या मतदारसंघातून अर्ज दाखल केला?
त्यांनी कोरची जिल्हा परिषद मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.

3) मोसमी आवाडे कोणत्या मतदारसंघातून लढत आहेत?
त्या रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत.

4) या घटनेमुळे राजकीय वाद का निर्माण झाला?
घराणेशाहीविरोधी आदेश असूनही एकाच कुटुंबातील उमेदवार उतरल्याने वाद निर्माण झाला.

5) या प्रकरणावर अधिकृत दुजोरा आहे का?
होय, प्रशासनाकडून या उमेदवारी अर्जांना अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com