primary teachers suspended : तुकाराम मुंडेंच्या निर्णयाचा दणका! कोल्हापुरात प्राथमिक शिक्षकांना भोवली बोगसगिरी, एकाच वेळी १३ जणांचे निलंबित

Tukaram munde Strict Orders On fake disability claims : सोयीच्या बदल्या करून घेण्यासाठी बनावट किंवा चुकीच्या तपासणी अहवाल तसेच दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्राबाबत बोगसगिरी करणाऱ्या शिक्षकांना नुकताच कोकणात दणका देण्यात आला आहे.
Kolhapur primary teachers suspension news; Tukaram munde
Kolhapur primary teachers suspension news; Tukaram mundesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील 3 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

  2. कोल्हापुरातही 13 प्राथमिक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाली असून 53 जणांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू आहे.

  3. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर ही कडक कारवाई करण्यात आली.

Kolhapur News : नुकताच रत्नागिरी जिल्ह्यातील 3 शिक्षकांचे निलंबन करण्यात आले असून यामुळे शिक्षक खात्यात खळबळ उडाली आहे. राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी बोगस दिव्यांगांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर हे निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शिक्षण खाते हादरले असतानाच कोल्हापुरात देखील तब्बल १३ प्राथमिक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. ही कारवाई देखील दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्राबाबत बोगसगिरी उघड झाल्याने करण्यात आली आहे. तर अद्याप उर्वरित ५३ जणांच्या प्रमाणपत्रांची चौकशी केली जात असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय, निमशासकीय नोकरीतील आरक्षणासह विविध शासकीय योजना, आर्थिक सवलती आणि इतर लाभांवर बोगस दिव्यांगांकडून डल्ला मारला जात आहे. या प्रकारामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होताना दिसत आहे. यामुळे असे प्रकार रोखण्यासह बोगस दिव्यांगांविरोधात तुकाराम मुंढे यांनी कडक कारवाई धोरण अवलंबले असून थेट दोषी असणार्‍या शिक्षकांना निलंबित करावे असे आदेशच दिले आहेत.

या निर्णायामुळे शिक्षण खात्यात भूकंप आला असतानाच कोकणात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तसेच इतर विविध प्रकारचे भत्ते लाटणाऱ्या 3 प्राथमिक शिक्षकांची तडकाफडकी निलंबन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील महावीर मिसाळ (मंडणगड), प्रदीप मोरे, राजेश भंडारे या शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तसेच इतर विविध प्रकारचे भत्ते सादर करून शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

Kolhapur primary teachers suspension news; Tukaram munde
Tukaram Munde : अखेर IAS तुकाराम मुंढेंनी मौन सोडले, 'त्या' आमदाराला जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, 'मी मनमानी...'

तर प्रशासनाने केलेल्या चौकशीत निलंबित केलेल्या शिक्षकांकडे शारीरिक व्यंगाच्या प्रमाणापेक्षा जास्त टक्केवारी दाखवणारी बोगस प्रमाणपत्रे मिळाली होती. त्यामुळे शासनाची दिशाभूल करणाऱ्या या तीन प्राथमिक शिक्षकांची तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. या निलंबनामुळे शिक्षण खातं हादरलं असून एकच खळबळ उडाली आहे.

अशातच आता अशीच कारवाई कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी मंगळवारी (ता.६) केली असून तब्बल १३ प्राथमिक शिक्षकांना निलंबित केले. गेली दोन महिने याबाबत चौकशी सुरू होती. प्रशासनाने केलेल्या चौकशीत या शिक्षकांनी येथील सीपीआर रुग्णालयासह इतर ठिकाणाहून घेतलेले वैद्यकीय प्रमाणपत्रे चुकीचे असल्याचे आढळली आहेत.

सोयीच्या ठिकाणी बदल्यांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्रांचा वापर केल्याची चर्चा सुरू होती. तसेच शिक्षकांनी बोगसगिरी करत दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्रांसाठी राजकीय दबावाचा वापर केल्याचीही कुजबूज सुरू होती. यावरूनच जिल्ह्यातील 355 शिक्षकांची फेरतपासणी करण्यात आली. ज्यात तब्बल २६ प्राथमिक शिक्षक दोषी आढळले. तर ३०२ शिक्षकांचे अहवाल योग्य असल्याचे समोर आले. तर उर्वरित ५३ जणांच्या प्रमाणपत्रांबाबत सध्या चौकशी केली जात आहे.

दरम्यान या २६ शिक्षकांनी बोगसगिरी करत सीपीआरकडून दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्रे मिळवल्याचे उघड झाले आहे. त्यातील चार शिक्षकांवर नोव्हेंबर २०२५ मध्येच कारवाई करण्यात आली असून आणखी १८ शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. ज्यापैकी चौघांनी खुलासे केले असून ते जिल्हा परिषद प्रशासनाने मान्य केले आहेत. तर एकाचे प्रमाणपत्र फेरतपासणीसाठी पुन्हा सीपीआरकडे पाठविण्यात आला आहे.

Kolhapur primary teachers suspension news; Tukaram munde
Tukaram Munde: तुकाराम मुंढेंचे निंलबन होणार? अधिवेशनात उदय सामतांचे स्पष्टीकरण; आरोपात तथ्य आहे का?

पण १३ शिक्षक प्राथमिक चौकशीत बोगस प्रमाणपत्रे घेतल्याने दोषी ठरले आहेत. या सर्व शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून त्यांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या पंचायत समित्यांमध्ये हजेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे शिक्षक पालकमंत्री असणाऱ्या प्रकाश आबिटकर यांच्या भुदरगड तालुक्यासह राधानगरी, कागल, करवीर, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील आहेत.

आणखी १५ संशयाच्या भोवऱ्यात

दरम्यान प्रशासनाने केलेल्या चौकशीत आणखी १५ शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात आले असून सीपीआरच्या नेत्रोपचार विभागाने त्यांना दिलेले नमुने मुंबईतील जे. जे. आणि ससून रुग्णालयास पाठवण्यात आले आहेत. ते अहवाल प्रलंबित असून त्या तपासण्या अजूनही झालेल्या नाहीत. त्यामुळे ते लवकर देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली असून ते १५ शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत.

Kolhapur primary teachers suspension news; Tukaram munde
Tukaram Munde: 'तुकाराम मुंढे'मुळे अधिवेशन गाजणार; भाजपचे आमदार आक्रमक

FAQs :

1. शिक्षकांचे निलंबन का करण्यात आले आहे?
बोगस दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्रांचा वापर केल्याच्या आरोपामुळे.

2. ही कारवाई कुठल्या जिल्ह्यांत झाली आहे?
रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांत.

3. या कारवाईमागे कोणाचे आदेश आहेत?
राज्य दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे.

4. अजून किती शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू आहे?
सुमारे 53 शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी सुरू आहे.

5. कोणत्या रुग्णालयांची प्रमाणपत्रे संशयाच्या भोवऱ्यात आहेत?
सीपीआर रुग्णालयासह इतर वैद्यकीय संस्थांची प्रमाणपत्रे तपासात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com