Eknath Shinde And Prakash Awade : आवाडेंचं अन् शिंदेंचं कनेक्शन वाढलं; मुख्यमंत्री करणार लोकसभेची उतराई?

Kolhapur Politics : लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील माने यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून 40 हजारपेक्षा जास्त मतांचे मताधिक्य मिळाले. तर आमदार प्रकाश आवाडे हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.
Eknath Shinde, Prakash Awade
Eknath Shinde, Prakash Awade Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून महायुतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे.महायुतीत ही जागा कोणाला सुटणार यावरून अनिश्चितता असताना आमदार प्रकाश आवाडे यांनी पुत्र राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. आवाडे हे महायुतीचे सदस्य असल्याने भाजप आणि त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आवाडे यांचे कनेक्शन वाढले आहेत.

प्रकाश आवाडे(Prakash Awade) हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याबाबत चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे. नुकताच झालेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी महिला सन्मान मिळाव्यात आवाडे पिता-पुत्रांची मुख्यमंत्र्यांशी जवळीक आणि विमान प्रवास यावरून बरेच तर्क-वितर्क लावले जात आहे.

नुकत्याच झालेल्या महिला सन्मानार्थ मेळाव्यानंतर राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासमवेत कोल्हापूर ते मुंबई असा विमान प्रवास केला. या प्रवासादरम्यान इचलकरंजी विधानसभा निवडणुकी होत असलेले तयारी. मतदारसंघातील राजकारण यावर चर्चा करण्यात आली. शिवाय इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा अंदाज हे घेण्यात आला.

माजी आमदार सुरेश हळवणकर हे या मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भाजप किंवा शिवसेना गटाकडून उमेदवारी मिळेल अगर न मिळेल यावर अवलंबून न राहता आमदार प्रकाश आवाडे यांनी पुत्र राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याशी जवळीक वाढल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Eknath Shinde, Prakash Awade
Video Vaibhav Naik : ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी PWD चं कार्यालय फोडलं, गंभीर कारण आलं समोर

लाडकी बहीण योजनेच्या वचनपू्ती सोहळ्यात राहुल आवाडे हे पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांच्या आसपासच वावरत होते. शिंदे हे सभास्थळी येत असतानाही राहुल आवाडे यांनी त्यांची साथसंगत केली. व्यासपीठावरही राहुल आवाडे हे मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते.

लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील माने यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून 40 हजारपेक्षा जास्त मतांचे मताधिक्य मिळाले. तर आमदार प्रकाश आवाडे हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. या मतदारसंघाच्या जीवावरच खासदार माने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे मताधिक्य तोडू शकले आहेत.

Eknath Shinde, Prakash Awade
Ramesh kadam : मोहोळमध्ये तुतारीचा उमेदवार कोण?; पवारांनंतर रमेश कदमांनी घेतली राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची भेट

तर या मतदारसंघातून भाजपकडून सुरेश हळवणकर हे निवडणुकीस इच्छुक आहेत. मात्र त्यांना डावलून भाजप आवाडे यांना उमेदवारी देईल शक्यता कमीच आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे घेण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. ही बाब हेरूनच आवाडे पिता-पुत्रांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढवली आहे. त्यामुळे येत्या काळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही लोकसभेतील उतराई करणार का? हे पाहणी महत्वाचा आहे.

Eknath Shinde, Prakash Awade
Sanjay Raut News: महिलेचं उद्धव ठाकरेंना पत्र, संजय राऊतांवर गंभीर आरोप; 'त्यांनी माझा पाठलाग केला, फोनवरून मला...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com