Ramesh kadam : मोहोळमध्ये तुतारीचा उमेदवार कोण?; पवारांनंतर रमेश कदमांनी घेतली राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची भेट

Mohol Assembly Constituency : मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम हेही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती.
Ramesh Kadam-Baliram Sate
Ramesh Kadam-Baliram SateSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 August : मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळावी, यासाठी माजी आमदार रमेश कदम यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची भेट घेऊन मोहोळमधून उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, पक्षाचे संजय क्षीरसागर यांचाही दावा मोहोळच्या उमेदवारीसाठी असणार आहे, त्यामुळे मोहोळमध्ये तुतारीचा उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता वाढली आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सोलापूर जिल्ह्यातील पाच मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP SP) वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यात मोहोळ मतदारसंघाचा समावेश असण्याची शक्यता आहे. मोहोळमधून (Mohol) शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय क्षीरसागर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी त्यांनी शक्तिप्रदर्शन करत तिकिटासाठी दावेदारी सांगितली आहे.

मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) हेही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर रमेश कदम हे मोहोळ मतदारसंघातील नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.

Ramesh Kadam-Baliram Sate
Nitesh Rane : ...तर मी आदित्य ठाकरेंची माफी मागायला तयार; नीतेश राणे असं का म्हणाले?

शरद पवार यांच्या भेटीनंतर रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची वडाळ्यात जाऊन भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. मोहोळमधून उमेदवारी मिळावी, यासाठीच आपण काका साठेंना भेटल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. मात्र, जिल्हाध्यक्ष साठे यांनी उमेदवारीचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच घेणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, भाजपचे नेते लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजीत ढोबळे यांनीही मोहोळमधून उमेदवारी मिळावी, यासाठी जयंत पाटील यांची भेट घेतली होती, त्यामुळे मोहोळमधून राष्ट्रवादीची उमेदवारी नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे.

Ramesh Kadam-Baliram Sate
Kolhapur Politics : उद्धव ठाकरेंना कोल्हापुरात पुन्हा धक्का; माजी आमदार बंडाच्या तयारीत, शिंदे गटाच्या गळाला लागणार?

यशवंत माने यांना महायुतीची उमेदवारी

महायुतीमध्ये मोहोळ मतदारसंघ हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार यशवंत माने हे मोहोळमधून राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असे पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे, त्यामुळे यशवंत माने यांच्या विरोधातील उमेदवार कोण असणार, याबाबत मोहोळ मतदारसंघात उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com