
Satara News : औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर,उस्मानाबादचं धाराशिव, अहमदनगरचं अहिल्यानगर असं नामांतर करण्याचा ऐतिहासिक निर्णय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं घेतला. या निर्णयावर राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. आता पुन्हा एकदा एका जिल्ह्याचं नामांतराचा मुद्दा पुढे आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याविषयी महत्त्वाचं विधान केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आपल्या कार्यकाळात पश्चिम महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचं नाव बदलण्यात येणार असल्याचं चिन्हं दिसून येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याविषयी महत्त्वाचं विधान केलं आहे. साताऱ्याला (Satara) 'राजधानी सातारा' असं म्हटलं जातं. एव्हाना सगळ्या सातारकरांकडून नेहमी असंच नाव उच्चारलं जातं.आता या शहराचं अधिकृतरित्या नामांतर 'राजधानी सातारा' असं करण्यात यावं अशी मागणी केली जात आहेत.
सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याच्या नामांतराविषयी मोठी अपडेट दिली. ते म्हणाले, जनतेची इच्छाच असेल तर ते नक्कीच पूर्ण केले जाईल. मी याबाबत माहिती घेणार असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. तसेच "आमचं महायुती सरकार जनतेचं, सर्वसामान्यांचं सरकार आहे.
सातारा जिल्ह्यात महायुती सरकारचे एकूण चार मंत्री आहेत.ते सगळे अतिशय प्रभावीपणे काम करत आहेत.महाबळेश्वर व पाचगणीसारख्या पर्यटनस्थळांबाबत सरकारकडून मोठा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. आमच्या सरकारकडून संबंधित पर्यटनस्थळांवरील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाईल.तसेच पर्यटन वाढण्यासाठी जे जे काही करता येईल त्या सर्व गोष्टींच्या पाठपुरावा करण्यात निश्चितच यश मिळणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यप्रकरणावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, संतोष देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. अतिशय निर्घृणपणे हत्या झाली आहे. शासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सीआयडी, एसआयटी लावलेली आहे. यातील एकही आरोपी सुटणार नाहीत. कोणाशीही लागेबांधे असले तरी सरकार कुणाला पाठीशी घालणार नाही. आरोपींना फाशी सारखी शिक्षा द्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली जाणार आहे. फास्टट्रॅकवर हा खटला चालवला जाणार आहे, असंही शिंदेंनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.