Narendra Modi Karad : पंतप्रधान मोदींच्या सभेला मुख्यमंत्री शिंदे अन् फडणवीस, पवारांची दांडी

Karad Modi Sabha : मुख्यमंत्री शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत तर उपमुख्यमंत्री पवार यांना सातारा हा जवळचा मतदार संघ आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार हे उपस्थित राहतील अशी सर्वांनाच आशा होती
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सोमवारी कऱ्हाड (जि. सातारा) येथे सभा झाली. सभेसाठी खुद्द पंतप्रधान मोदी आले असतानाही जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित राहिले. त्याचीच चर्चा आज सभास्थळी होती.

Narendra Modi
Narendra Modi On Congress : 'कर्नाटक पॅटर्न'वरून मोदींचा काँग्रेसला कडक इशारा; 'मी जिवंत आहे तोपर्यंत ओबीसीत...'

पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कऱ्हाड येथे जाहीर प्रचारसभा झाली. पंतप्रधानांच्या अनेक सभांना राज्याचे प्रमुख म्हणुन मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यापूर्वी अनेकदा उपस्थित राहिले आहेत.

त्यातच मुख्यमंत्री शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत तर उपमुख्यमंत्री पवार यांना सातारा हा जवळचा मतदार संघ आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार हे उपस्थित राहतील अशी सर्वांनाच आशा होती. मात्र पंतप्रधानांच्या सभेसाठी आज तिघेही गैरहजर होते. ते अनुपस्थित राहिल्यामुळे उपस्थितांत त्याचीच चर्चा सुरू होती.

आमदार मकरंद पाटीलही अनुपस्थित...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वाईतील आमदार मकरंद पाटील हे सभेसाठी उपस्थित राहतील, अशी चर्चा होती. पालकमंत्री व आमदार यांच्यासमवेत ते व्यासपीठावर येतील असे सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात ते उपस्थित राहिले नाहीत. त्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे न आल्याने ते उपस्थित राहिले नसल्याचीही चर्चा होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
Uddhav Thackeray Sabha News : आम्हांला नकली म्हणालात, पण शिवसेनेचा दणका काय असतो, ते 4 जूनला निकालातून कळेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com