Eknath Shinde News : कोल्हापूर-सांगलीबाबत मुख्यमंत्र्यांच्या आपत्ती व्यवस्थापनाला सूचना, कर्नाटकबाबत 'हे' पाऊल उचला

CM Shinde Meeting Disaster Management : मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर सांगली आणि राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली. जिल्हा प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापनाला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Kolhapur News, 29 May : 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरानंतर कोल्हापूर ( Kolhapur) आणि सांगली (Sangli) जिल्ह्यात पावसाळ्यात विशेष काळजी घेतली जाते. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी आणि उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरापासून ते राज्यस्तरावर प्रयत्न केले जातात.

यंदाही भारतीय हवामान खात्याने पावसाचा अंदाज जास्त असल्याचा व्यक्त केल्यानंतर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील संभाव्य पूर रेषा नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्यस्तरावर विशेष प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर सांगली आणि राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली. जिल्हा प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापनाला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या गत वर्षीपेक्षा धरणात पाणीसाठा अधिक शिल्लक आहे. यंदा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसू नये यासाठी, धरणातील पाणी विसर्गाबाबत काटेकोरपणे नियोजन करा.

शिवाय महाराष्ट्र आणि कर्नाटक अधिकाऱ्यांची समन्वयक बैठक घेऊन अलमट्टी धरणाच्या प्रशासनाबरोबर पाणी विसर्ग करण्याबाबत समन्वय ठेवा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी दिल्या. त्यांनी राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापुरातून या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, आपत्ती व्यवस्थापन, पाटबंधारे विभागातील अधिकारी उपस्थित होते. "यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे. धरण क्षेत्रात देखील चांगला पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन संभाव्य महापुराचा धोका उद्भवू शकतो. कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घ्या. अलमट्टी धरणावर एका जलअभियंत्याची नियुक्ती करा," अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

Eknath Shinde
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदे मूळगावी; विश्रांती की विधानसभेच्या प्लॅनिंगसाठी..!

"संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित करणाऱ्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था करत त्यांच्यासाठी चांगले अन्न आणि औषध पाण्याची व्यवस्था करा. पशुधनाच्या अन्न आणि चाऱ्याची व्यवस्था करा. महापुराच्या काळातही पिण्याचा पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा सुरळीत राहील, याचीही खबदरारी घ्या. ज्या गावांना, नागरी वस्तींना भूस्खलनाचा धोका आहे तेथे तातडीने उपाययोजना करा," असं निर्देशही मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्या प्रशासनाला दिले आहेत.


( Edited By : Akshay Sabale )

Eknath Shinde
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदे मूळगावी; विश्रांती की विधानसभेच्या प्लॅनिंगसाठी..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com