Shahajibapu Patil : शिवसेनेकडून शहाजीबापूंना विधान परिषदेवर संधी? एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी मुंबईला रवाना

Legislative Council Election : माणदेशी भाषाशैलीमुळे संपूर्ण राज्यात परिचित झालेले शहाजीबापू पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. पाटील यांच्या वक्तृत्वशैलीमुळे राज्यस्तरावरील त्यांची उपयुक्तता लक्षात घेता त्यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांकडून वर्तविण्यात येत आहे.
Shahajibapu Patil
Shahajibapu Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangola, 04 March : विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांसाठी आयोगाकडून सोमवारी (ता. 03 मार्च) निवडणूक जाहीर झाली आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या नेत्यांना महायुतीच्या नेत्यांकडून शब्द देण्यात आला आहे, त्याची परिपूर्ती करण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. ‘काय झाडी, काय डोंगार’ फेम सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनाही पक्षश्रेष्ठींकडून विधान परिषदेचा शब्द दिल्याची चर्चा आहे, त्यामुळे शहाजीबापूंची वर्णी लागणार का, याबाबत सांगोल्यात मोठे कुतूहल आहे. दरम्यान, माजी आमदार पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

दरम्यान, विधान परिषदेवर संधी मिळण्याबाबत माजी आमदार शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) यांनी सांगितले की, विधान परिषदेवर आमदार म्हणून मला संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र, याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील. मी माझे काम करीत राहणार आहे.

माणदेशी रांगड्या भाषाशैलीमुळे संपूर्ण राज्यात परिचित झालेले शहाजीबापू पाटील यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र, पाटील यांच्या वक्तृत्वशैलीमुळे राज्यस्तरावरील त्यांची उपयुक्तता लक्षात घेता त्यांना विधान परिषदेवर (Legislative Council) संधी मिळण्याची शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांकडून वर्तविण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी पाटील यांनी ती उपयुक्तता सिद्ध करून दाखवली आहे, त्यामुळे त्यांना संधी मिळावी, असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

मागील खेपेला शहाजी पाटील हे सोलापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे एकमेव आमदार निवडून आले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शहाजीबापू पाटील हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. त्याचवेळी गुवाहाटीत असताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्याशी केलेला संवाद व्हायरल झाल्यानंतर ते संपूर्ण राज्याला परिचित झाले होते.

Shahajibapu Patil
Sampark Mantri : भाजपच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंनी संपर्कमंत्री म्हणून नेमला ठाण्यातील विश्वासू शिलेदार!

एकनाथ शिंदे आणि शहाजी पाटील यांच्यातील जवळकीता सर्वश्रूत आहे. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी सांगोला सोडून इतर मतदारसंघात जाऊन प्रचार केला होता. तसेच, शहाजीबापूंसाठी शिंदे यांनी वेळात वेळ काढून प्रचारसभा घेतली होती. याशिवाय मागील पंचवार्षिकमध्ये शहाजी पाटील यांनी सांगोल्यात सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणला होता, त्यामुळे शहाजीबापू पज्ञटील आमदार हवेत, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यातूनच त्यांना विधान परिषदेवर संधी मिळावी, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.

Shahajibapu Patil
Leader of Opposition : विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांचे नाव जाहीर; अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरेंनी दिले 'हे' उत्तर!

मी काम करत राहणार : शहाजीबापू पाटील

यासंदर्भात शहाजीबापू पाटील म्हणाले, सांगोल्यातील विकास कामांच्या संदर्भात मी मुंबईला निघालो आहे. आतापर्यंत तालुक्यात (स्व.) बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना मार्गी लागली आहे. आणखीही काही कामे मार्गी लावायची आहेत. मी सध्या आमदार नसलो तरी सांगोल्यातील कामे करण्यासाठी मी नेहमीच एकनाथ शिंदे यांना भेटत असतो. मला विधान परिषदेवर संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, त्याबाबतचा निर्णय हे एकनाथ शिंदे हेच घेतील. मी मात्र काम करत राहणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com