जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचासह पाच सदस्यांना अपात्र ठरवलं पण निवडणूक आयोगानं तारलं

निवडणूक खर्च विहित नमुन्यात सादर न केल्याने मरवडे गावच्या सरपंचांसह पाच सदस्यांवर अपात्रतेची कारवाई झाली होती.
Sarpanch
Sarpanch sarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावचे विद्यमान सरपंच सचिन घुले यांच्यासह पाच सदस्यांना निवडणूक खर्च विहीत नमुन्यात सादर न केल्याने सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अपात्र ठरवले होते. ही कारवाई रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) एका बड्या पदाधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांवर दबाब टाकल्याची चर्चा होती. आता जिल्हाधिकारी शंभरकर (Milind Shambharkar) यांच्या या निर्णयाला निवडणूक आयोगाने (Election Commission) स्थगिती दिली आहे.

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी शंभरकर यांचा हा आदेश या गटात महत्त्वपूर्ण मानला जात होता. या निर्णयाविरोधात या सदस्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे उमेदवाराने बँक खाते स्वतंत्रपणे उघडले पण कोरोना महामारीमुळे त्याचे आर्थिक व्यवहार बँक खात्यावरून करता आले नाहीत. तसेच, निवडणुकीचा खर्च वेळेत दिला असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे विद्यमान सरपंचासह पाच सदस्यांना सरपंच निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.

Sarpanch
रशिया-युक्रेन वादात भारताची उडी! मोदींनी थेट पुतीन यांना फोन लावला अन् म्हणाले...

मरवडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यामध्ये मंगळवेढा तालुक्याच्या राजकीय पटलावरील माजी आमदार प्रशांत परिचारक, धनश्री परिवाराचा काळुंगे गट, बामसेफ, शेतकरी संघटना तसेच पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसीचे अध्यक्ष लतिफ तांबोळी यांच्या गटाने एकत्र येत गावविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता मिळवली होती. सत्ताधारी गटाचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह अन्य तीन ग्रामपंचायत सदस्यांनी या निवडणुकीतील खर्च विहीत नमुन्यात सादर केला नसल्याची तक्रारी विरोधी गटाचे बालाजी पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

Sarpanch
मलिकांना न्यायालयाचा मोठा दिलासा; तिन्ही मागण्या केल्या मान्य

राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या संहितेप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करताना उघडण्यात आलेल्या बँक खात्यावरून निवडणूक खर्च करणे बंधनकारक असताना या नियमांचे उल्लंघन झाले आहे. सरपंचांसह पाच सदस्यांनी रोखीने खर्च केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. सत्ताधारी गटाच्या पाच सदस्यांविरोधातील सुनावणी ७ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सरपंच सचिन घुले, मीनाक्षी सूर्यवंशी, अंजना चौधरी, सुमन गणपाटील, दिक्षा शिवशरण या सदस्यांना आदेशाच्या तारेखपासून पदावर राहण्यास अपात्र घोषित करण्यात आले. या पाच जणांवर पुढील पाच वर्षे कोणतीही निवडणूक लढविण्यावर निर्बंध घातले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com