Chandrababu Naidu : देशात मोदी मूड, एनडीए 400+ जागा जिंकेल; अंबाबाईच्या दर्शनानंतर चंद्राबाबू नायडूंचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेबरोबरच आंध्र प्रदेश मधील विधानसभा निवडणूक पार पडली. 175 विधानसभा मतदारसंघापैकी 143 विधानसभा मतदारसंघात तेलगू देशम पार्टीच्या वतीने उमेदवार उभा करण्यात आले आहेत.
Chandrababu Naidu
Chandrababu NaiduSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 16 May : आंध्र प्रदेश राज्यात लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे सपत्नीक दर्शन घेतले. 2024 ची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर ते प्रथमच कोल्हापूरला आले होते. त्यावेळी शहरासह मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

यावेळी चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu ) यांनी माध्यमांशी संवाद साधला. मोदी (Narendra Modi) इज व्हेरी गुड, देशात मोदींचा मूड आहे. एनडीएसाठी देशामध्ये सर्वात सकारात्मक वातावरण आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए 400+ जागा जिंकेल. श्री अंबाबाई देवीच्या दर्शनानंतर चंद्राबाबू नायडू यांनी विश्वास व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrababu Naidu
Sharad Pawar Vs Raj Thackeray : शरद पवारांकडून राज ठाकरेंच्या राजकीय अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह

दरम्यान, लोकसभेबरोबरच आंध्र प्रदेश मधील विधानसभा निवडणूक पार पडली. 175 विधानसभा मतदारसंघापैकी 143 विधानसभा मतदारसंघात तेलगू देशम पार्टीच्या वतीने उमेदवार उभा करण्यात आले आहेत. वाय एस आर रेड्डी यांच्या विरुद्ध त्यांचा सामना आहे. मात्र आंध्र प्रदेशच्या घडामोडीवर बोलण्यास चंद्राबाबू नायडू यांनी टाळले आहे.

सकाळी 10 पासूनच बंदोबस्त

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज कोल्हापूर दौऱ्यावर येत असताना करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यात असा नियोजित कार्यक्रम होता. सुरक्षेच्या कारणासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र, सकाळी 10 पासूनच परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

Chandrababu Naidu
Shyam Rangeela News : मोदींविरुद्ध निवडणूक लढवण्याचं स्वप्न भंगलं; अर्ज फेटाळल्यानंतर श्याम रंगीला भावूक...

भाविकांना दीड तास उन्हाचे चटके

माजी मुख्यमंत्री नायडू येण्यापूर्वी तासभर अगोदर पोलिसांनी दक्षिण दरवाजासमोरील येणाऱ्या भाविकांची वाट बंद केली होती. आलेल्या भाविकांनी चप्पल स्टॅन्डला काढल्यामुळे भाविकांची ही गैरसोय झाली. त्यामुळे नायडू जाईपर्यंत दीड तास उन्हाचे चटके सहन करेपर्यंत भाविकांना शेजारी बसावे लागले.

Chandrababu Naidu
Mamata Banerjee: पाचव्या टप्याच्या मतदानापूर्वीचं ममता बॅनर्जींची मोठी घोषणा; इंडिया आघाडीचे सरकार आले तर..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com