Purandar News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काय करायचे, ते त्या त्या वेळी ठरवू. लोकसभेची तुम्ही काळजी करू नका. भावाला बहिणीची काळजी आहे, तुम्ही आता आमदारकीची तयारी करण्यास हरकत नाही. पुरंदर तालुक्यात अजित पवार गटाचा, महायुतीचा आमदार होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केला. (Ajit Pawar's Group will become MLA from Purandar: Pradeep Gartkar)
पुरंदर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या निवडी, निवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीचे आयोजन खळद येथे आयोजित करण्यात आले होते. त्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर बोलत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ते म्हणाले की, अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर संभ्रमावस्थेत आहेत. पण, तळ्यात मळ्यात न राहता कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या तरी एका गटात सामील झाले पाहिजे. आता भावनिक विचार करून चालणार नाही. पवारांपासून आपण दूर जात नाही, तर आपण सर्वजण पवार कुटुंबीयांसोबतच असणार आहोत. अजित पवार गटाने ग्रामपंचायत निवडणुकीत पुरंदर तालुक्यात चांगले यश मिळविले आहे. आता विधानसभेच्या तयारीला कार्यकर्त्यांनी लागण्याची गरज आहे.
नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने अल्पावधीतच चांगले यश मिळविले आहे. लोकसभा, विधानसभेसह अनेक निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षबांधणीचे काम केले पाहिजे. विश्वास दिला की जनता तुमच्याकडे येत असते. जनता तुम्हाला पारखून बघत असते, त्यामुळे आपल्या सर्वांना लोकांमध्ये जावे लागेल. विशषेतः सोशल मीडियावर सर्वांनी सक्रिय राहावे, असेही आवाहन पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी युवकांना राजकारणात काम करण्याचा सल्ला दिला. आता युवकांना संघटनेत काम करण्याची संधी मिळणार आहे, त्यातून त्यांना नवी ओळख निर्माण करता येणार आहे, असेही घुले यांनी सष्ट केले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष मोनिका हरगुडे, युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ, पुरंदर हवेलीचे अध्यक्ष वामन जगताप, सोमेश्वर कारखान्याचे संचालक बाळासाहेब कामथे, शांताराम कापरे, जितेंद्र निगडे, विश्वास जगताप, सभापती शरद जगताप, तानाजी जगताप, लक्ष्मण गोफणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.