जयंत पाटलांच्या नेतृत्वाखालील आणखी एक संस्था बिनविरोध होणार?

इस्लामपूरमधील राजारामबापू दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

इस्लामपूर (जि. सांगली) : राजारामबापू पाटील सहकारी दूध संघ संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रंजना बारहाते या काम पाहत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार (ता. १३ डिसेंबर) हा अंतिम दिवस आहे. दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष विनायकराव पाटील यांचा आज एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्वाखाली या संघाची निवडणूक बिनविरोध होईल, अशीच शक्यता जादा आहे. (Election program of Rajarambapu Dudh Sangh in Islampur announced)

राजारामबापू पाटील सहकारी दूध संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार (ता. १३ डिसेंबर) अंतिम दिवस आहे. त्यानंतर १४ तारखेला छाननी, तर १५ डिसेंबरला अर्ज माघारीचा दिवस आहे. निवडणुकीसाठी ३० तारखेला चिन्ह वाटप, गरज पडल्यास ८ जानेवारीला सकाळी ते ८ ते सायंकाळी ४ पर्यंत मतदान, व त्यानंतर मतमोजणी व त्याच दिवशी निकाल घोषित होईल. एकूण १२५ संस्था सभासद संख्या असलेल्या या निवडणुकीत फक्त ९५ ठराव निवडणुकीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे ९५ मतदारच निवडणुकीचा हक्क बजावतील.

Jayant Patil
सूत्रे हाती येताच माजी आमदार सूर्यकांत दळवींनी केली मोठी घोषणा

काही गावच्या इच्छुकांनी आपली संस्था बंद पडल्याने इतर गावच्या संस्थांमधून आपले ठराव पाठवले आहेत. मात्र, दूध संघाच्या संचालक मंडळ बैठकीत स्वतःच्या गावच्या संस्थेमधील ठराव पात्र धरावा, असा ठराव केल्याने दुसऱ्या गावातील संस्थेचा ठराव घेऊन निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना त्याचा फटका बसणार आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या राजारामबापू दूध संघाची निवडणूक यावेळीही बिनविरोध होईल, अशी शक्यता आहे.

Jayant Patil
महाडिकांकडून भरमू पाटलांना निरोप गेल्यास राष्ट्रवादीचे आमदार पाटील होणार बिनविरोध

इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून निवड प्रमुख म्हणून राजारामबापू बँकेचे अध्यक्ष श्यामराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील यांची कमिटी नेमली आहे. ही कमिटी उमेदवारांची निवड करून त्यांना अर्ज दाखल करायाला सांगतील. सध्याच्या संचालक मंडळातील बहुतांशी संचालकांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे, तर काही नवीन चेहरेही दूध संघ संचालक मंडळात दिसतील .एकूणच १९ संचालक असलेली दूध संघाची निवडणूक बिनविरोध होईल, असे सध्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com