Solapur DPC : भाजपकडून कल्याणशेट्टी, आवताडे, परिचारक, मोहिते पाटील, तर शिंदे गटाकडून पाटील, सावंत, शिंदे यांना संधी

जिल्हा नियोजन समितीवर एकंदरीत भारतीय जतना पक्षाचे वर्चस्व राहणार असल्याचे जाहीर झालेल्या सदस्यांवरून वाटत आहे.
Solapur DPC Membar
Solapur DPC MembarSarkarnama
Published on
Updated on

मंगळवेढा (जि. सोलापूर) : महाविकास आघाडी सरकारने नेमलेली सोलापूर (Solapur) जिल्हा नियोजन समिती (DPC) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने सत्तेवर येताच बरखास्त केली होती. तिच्या नियुक्तीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. सोलापूर जिल्हा नियोजन समितीमध्ये भाजपकडून (BJP) आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, प्रशांत परिचारक, धैर्यशील मोहिते पाटील यांना, तर शिंदे गटातील माजी आमदार नारायण पाटील, शिवाजी सावंत, अमोल शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. (Elections of Solapur District Planning Committee members finally announced)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस सरकारने सोलापूर जिल्हा नियोजन समिती नव्याने गठीत केली आहे. या समितीत भाजप आणि शिंदे गटाच्या नेते असलेल्या २० सदस्यांच्या समावेश आहे. नव्या समितीमुळे नियोजन समितीच्या निधी खर्चास आता गती येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय आज (ता. १० जानेवारी) उपसचिव संजीव धुरी यांच्या सहीने पारित करण्यात आला आहे.

Solapur DPC Membar
Solapur News : भाजप आमदाराच्या मुलाविरोधात कोर्टाने दिला कारवाईचा आदेश

या समितीत पंढरपूरमधून माजी आमदार प्रशांत परिचारक, मंगळवेढ्यातून माजी सभापती प्रदीप खांडेकर यांना संधी देण्यात आली. माजी सभापती प्रदीप खांडेकर हे समाधान आवताडे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. यापूर्वी त्यांनी पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून कारभार पाहिला आहे. त्यांना या कामाचे बक्षीस शिंदे-फडणवीस सरकारकडून मिळाले आहे.

Solapur DPC Membar
Amravati Vidhan Parishad : अमरावतीसाठी राष्ट्रवादीही प्रचंड आग्रही : महाआघाडीत जागावाटपावरून पेच

महाविकास आघाडी सरकारच्या बरखास्तीनंतर नव्याने स्थापन झालेल्या सरकारला सहा महिन्यानंतर नियोजन समितीच्या सदस्य निवडीस मुहूर्त मिळाला. नवीन सदस्यांमध्ये विधानमंडळ सदस्यांमधून आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार समाधान आवताडे (दोघेही भाजप) यांना संधी देण्यात आली आहे. जिल्हा नियोजनशी संबंधित ज्ञात असलेल्या समितीमधून अण्णाराव बाराचारे (कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), शिवाजी सावंत (शिंदे गट, वाकाव, ता. माढा), धैर्यशील मोहिते पाटील (भाजप, अकलूज, ता. माळशिरस), माजी आमदार प्रशांत परिचारक (भाजप, पंढरपूर) यांना संधी देण्यात आली आहे.

Solapur DPC Membar
Chhagan Bhujbal News: बिहारला जमते ते महाराष्ट्राला का शक्य होत नाही!

विशेष निमंत्रित सदस्य म्हणून चनगोंडा हावनाळे (ब्रदर, ता. दक्षिण सोलापूर), चेतनसिंह केदार (सांगोला भाजप), गणेश चिवटे (करमाळा शिंदे गट), योगेश बोबडे (टेंभुर्णी, ता. माढा), केशवराव पाटील (निमगाव, ता. माळशिरस), सुनील चव्हाण (टाकळी सिकंदर, ता. मोहोळ), प्रदीप खांडेकर (भाजप, हिवरगाव, ता. मंगळवेढा), रफिक नदाफ (सांगोला), उमेश गायकवाड (सलगरवाडी सोलापूर), विजय गरड (पांगरी, ता. बार्शी), नारायण पाटील (जेऊर, ता. करमाळा, शिंदे गट), अमोल शिंदे (उत्तर कसबा, सोलापूर शिंदे गट), नागेश भोगडे(उत्तर कसबा, सोलापूर), अशोक दुस्सा (न्यू,पाच्छापेठ, सोलापूर) यांची निवड करण्यात आली आहे.

आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांनी शिंदे-फडणवीस सरकारसाठी या निवडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com