Ichalkaranji Constituency : बावनकुळेंच्या दौऱ्यानंतरही भाजप नेत्याची बंडखोरी; इचलकरंजीत शेळकेंनी दंड थोपटले!

MaharashtraAssembly Election 2024 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यात त्यांनी माजी आमदार तथा भाजपचे नेते सुरेश हळवणकर आणि आमदार प्रकाश आवाडे यांचे मनोमिलन केले, तरीही इचलकरंजीमध्ये भाजपला तडा गेला आहे.
ChandrashekharBawankule-Prakash Awade-Suresh Halvankar-Hindurao shelke
ChandrashekharBawankule-Prakash Awade-Suresh Halvankar-Hindurao shelkeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 19 October : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच इचलकरंजी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी माजी आमदार तथा भाजपचे नेते सुरेश हळवणकर आणि आमदार प्रकाश आवाडे यांचे मनोमिलन केले, तरीही इचलकरंजीमध्ये भाजपला तडा गेला आहे. भाजप नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरणार असून माझ्याकडे सर्व पर्याय खुले आहेत, असा इशाराच भाजप नेत्यांना दिला आहे.

भाजपचे (BJP) माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी स्वतःच्या उमेदवारीची घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली. आपल्यासमोर महाविकास आघाडीसह सर्व पर्याय खुले आहेत, असे त्यांनी जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची सांगली जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी भेट घेतली होती.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात (Ichalkaranji Assembly Constituency ) भाजपमध्ये प्रकाश आवाडे यांची इंट्री झाल्यानंतर सुरेश हळवणकर (Suresh Halwankar) आणि शेळके समर्थकांमध्ये नाराजी होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी हळवणकर आणि आवाडे यांच्यात मनोमिलन घडवून आणले आहे.

ChandrashekharBawankule-Prakash Awade-Suresh Halvankar-Hindurao shelke
Shrigonda Constituency : उमेदवारी मिळाली, तरी प्रतिभा पाचपुतेंची 'सागर' बंगल्याकडे धाव; भाजप काय निर्णय घेणार?

भाजपने आवाडे घराण्यातच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी माझी उमेदवारी असणार आहे. इचलकरंजीसह सहा गावांतील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, असा दावाही शेळके यांनी पत्रकार परिषदेत केला.

हिंदुराव शेळके हे माजी आमदार सुरेश हळवणकर यांची कट्टर समर्थक आहेत. फडणवीस सरकारच्या काळात शेळके यांनी यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. याशिवाय इचलकरंजीचे माजी नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. प्रकाश आवाडे यांच्या भाजप प्रवेशानंतर मात्र त्यांच्या भूमिकेत बदल झाला आहे.

ChandrashekharBawankule-Prakash Awade-Suresh Halvankar-Hindurao shelke
Mumbai BJP : मुंबईतील भाजपच्या तीन आमदारांचं ‘टेन्शन’ वाढलं; पहिल्या यादीतून ‘OUT’, दुसऱ्यात स्थान मिळणार का?

हिंदुराव शेळके यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे इचलकरंजीकरांचे विशेष लक्ष लागले होते. त्यांच्या निवासस्थानी शहरातील दोन दिग्गज नेत्यांबरोबर त्यांची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com