
Solapur, 25 July : जातीच्या दाखल्याचा आणि आमदारकीचा आता काय संबंध येत नाही, तो 2029 चा संबंध आहे. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, माझा जातीचा दाखला कुणी रद्दही केला समजा, तर 2029 मध्ये निवडणूक लढविण्यासाठी मला तेच स्वतःहून पुन्हा आणून देतील, असे विधान माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम जानकर यांनी केले आहे. त्यामुळे जानकरांच्या मनात 2029 चे काय गणित आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
माजी आमदार हणमंतराव डोळस यांचे चिरंजीव संकल्प डोळस यांनी माळशिरसचे (malshiras) आमदार उत्तम जानकर यांचा जातीचा दाखला खोटा असल्याचा आरोप करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरून उच्च न्यायालयाने जानकर यांना नोटीस पाठवली असून येत्या 30 जुलै रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. त्याबाबत जानकर हे नेत्यांच्या गाठीभेटी घेतल आहेत, असा आरोप होत आहे.
दरम्यान, माझ्या जातीच्या दाखल्याचा आणि आमदारकीचा आता कोणताही संबंध येत नाही, तो संबंध आता 2029 मध्येच येणार आहे. विधानसभा निवडणुकीत एकदा छाननी झाली की, त्याचा जातीच्या दाखल्याशी संबंध येत नाही, असाही दावा उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत जानकर म्हणाले, पांडुरंगाच्या दारात माझी आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. यापूर्वी आळंदीत माझ्या हस्ते इंद्रायणीची पूजा ठेवण्यात आली होती. त्यावेळी अचानकपणे त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंही आले होते. त्यावेळी माझी शिंदे यांच्याशी भेट झाली होती. या दोन्ही भेटी संतांच्या पावन भूमीत झाल्या.
एक आदर्शवत, जमिनीवर पाय ठेवून चालणारा आणि स्वतः शेती करणारा हा राज्यकर्ता आहे. कोणताही अहंभाव नाही, मनात कुठलीही अभिलाषा नाही. बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन केले आहे. हा कर्जमाफीचा निर्णय एकनाथ शिंदेच करू शकतात. म्हणून पांडुरंगाच्या दारात, पांडुरंगाला साक्षी ठेवून एकनाथ शिंदे यांनी हे काम करावं. तुम्ही ज्या प्रमाणे चांगली कामं केली आहेत, तसं कर्जमाफीचं कामही करावं, अशी विनंती एकनाथ शिंदे यांना केली, असे जानकर यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अनेकवेळा पंढरपूरला येत असतात. अशा वेळी आपल्या भागातील महत्वाच्या कामासंदर्भात राज्यकर्त्यांच्या भेटीगाठी होतच असतात. त्यामुळे ज्यांचे मन हलकं असेल, त्यांचे धाबे दणाणतील, असे विधान जानकर यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.