Sachin Kalyanshetti : अक्कलकोटमध्ये सबकुछ कल्याणशेट्टी...

Akkalkot Politic's : सोलापूर जिल्ह्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व. महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमध्ये कमळ फुलले. अक्कलकोटमध्ये सचिन कल्याणशेट्टी यांच्या रणनीतीमुळे सबकुछ कल्याणशेट्टी समीकरण मजबूत. राजकीय चर्चांना वेग.
Sachin Kalyanshetti
Sachin Kalyanshetti Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 February : सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यात नगरपालिकांपासून, झेडपी आणि महापालिकेवरही बहुमताने कमळ फुलले आहे. त्याच पद्धतीने अक्कलकोट तालुक्यातही सबकुछ कल्याणशेट्टी असे समीकरण बनले आहे. अर्थात, त्यामागे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची रणनीती, भाजप कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम आहेत, हे नाकारून चालणार नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात झाल्या. त्यात भारतीय जनता पक्षाला थेट नगराध्यक्ष जादा निवडून आणता आले नसले तरी नगरसेवक हे मोठ्या संख्येने प्रथमच निवडून आले आहेत. जिल्ह्यात भाजपचे तीन नगराध्यक्ष निवडून आले, त्यापैकी दोन नगराध्यक्ष हे अक्कलकोट तालुक्यातील आहेत, त्यामुळे पहिल्याच निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टींनी (Sachin Kalyanshetti) ताकद दाखवून दिली.

त्यातही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी हे नगराध्यक्षपदी थेट जनतेतून निवडून आले आहेत. त्यामुळे अक्कलकोट (Akkalkot) नगरपालिकेत कल्याणशेट्टी यांचा शब्द प्रमाण असणार आहे. नगरपालिकानंतर सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यात विजयातही कल्याणशेट्टी यांनी निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी नाकारली असली तरी त्यांची भूमिका महत्वाची मानली जाते.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भाजपने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अक्कलकोटमधून आमदार कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी आणि पंचायत समितीमध्ये त्यांचे पुतणे सागर कल्याणशेट्टी निवडून आले आहेत.

Sachin Kalyanshetti
NCP ZP Politics : पश्चिम महाराष्ट्रात हात पाय पसरणाऱ्या भाजपचे नाक राष्ट्रवादीने दाबलं; सातारा, सांगली, कोल्हापूर झेडपीवर घड्याळ येणार?

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसीसाठी राखीव आहे. शांभवी कल्याणशेट्टी ह्या त्या जागेवरून निवडून आलेल्या आहेत, त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आमदार कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्या नावाला वरिष्ठांकडून नकार मिळण्याचे कोणतेही कारण सध्या दिसत नाही.

अक्कलकोट पंचायत समितीमध्ये निवडून आलेले आमदार कल्याणशेट्टी यांचे पुतणे सागर कल्याणशेट्टी यांची पक्षनेते म्हणून निवड करण्यात आलेली आहे. अक्कलकोट तालुक्यातील आणि मतदारसंघातील बहुतांश सर्व जागांवर कल्याणशेट्टी यांनी भाजपचे उमेदवार निवडून आणले आहेत, त्यामुळे अक्कलकोटमध्ये सध्या सबकुछ कल्याणशेट्टी अशीच परिस्थिती आहे.

Sachin Kalyanshetti
Gokul Election 2026 : सत्तांतरानंतर गोकुळमध्ये मागील पाच वर्षाच वाढलेले 'ते' 1854 सभासद कुणाच्या पथ्यावर पडणार?

भारतीय जनता पक्षाची जिल्ह्यातील सात पंचायत समितीमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. पक्षाकडून सहा पंचायत समितीमध्ये पक्षनेते निवडण्यात आले आहेत. पंचायत समितीनिहाय पक्षनेते आणि उपनेते पुढील प्रमाणे बार्शी : भीमा गव्हाणे, किरण घुले, अक्कलकोट : सागर कल्याणशेट्टी, विनोद मोरे, दक्षिण सोलापूर : बलवान गोतसुर्वे, मोहोळ : संजीव खिलारे, पंढरपूर : निखिल गिरीगोसावी, माळशिरस : दत्तात्रेय शेळके, करमाळा : सोनाली तकीक.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com