Karad News : शेतकरी नेते संदीप गिड्डेंचा उद्या भाजप प्रवेश; देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती...

Sandip Gidde संदीप गिड्डे - पाटील हे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर काम करीत आहेत. राज्यातील ऐतिहासिक शेतकरी संपामध्ये त्यांचा मुख्य सहभाग होता.
Devendra Fadanvis, Sandip Gidde
Devendra Fadanvis, Sandip Giddesarkanama

-हेमंत पवार

Karad News : शेतकरी नेते संदीप गिड्डे - पाटील हे उद्या (बुधवारी) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्या उपस्थितीत मुंबई येथे ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.

संदीप गिड्डे - पाटील Sandip Gidde हे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर काम करीत आहेत. राज्यातील ऐतिहासिक शेतकरी संपामध्ये त्यांचा मुख्य सहभाग होता. हा पुणतांबा येथून पेटलेली शेतकरी संपाची ठिणगी राज्यभर पसरली होती. याशिवाय केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले होते.

या आंदोलनात गिड्डे यांनी महाराष्ट्राचे maharashtra नेतृत्व केले होते. गिड्डे - पाटील हे शेतकऱ्यांच्या समस्यांवर सातत्याने आवाज उठवत असतात. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडून शेतकऱ्यांना Farmers न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

Devendra Fadanvis, Sandip Gidde
Satara Congress News : कर्नाटक निवडणुकीत भाजपला बजरंग बलीही वाचवणार नाही : नाना पटोले

गेल्या काही महिन्यांपासून गिड्डे हे तेलंगाणा येथील शेतकऱ्यांच्या मॉडेलवर अभ्यास करीत आहेत. या राज्यात चंद्रशेखर राव Chandrshekhar Rao यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. या योजनांवर गिड्डे हे सखोल अभ्यास करीत आहेत.

Devendra Fadanvis, Sandip Gidde
Farmers' Agitation : सिबील नावाचे भूत मानगुटीवर, शेतकरी धडकले एसडीओ कार्यालयावर !

तेथील शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून जे दिलं जातेय त्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यांच्या संदर्भात गिड्डे यांचा चांगला अभ्यास असून शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेताना भाजपला त्यांची मदत होणार आहे. उद्या (बुधवारी) त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.

Devendra Fadanvis, Sandip Gidde
Mumbai NIA News : मुंबई एनआयएकडे दिली जयेशच्या तपासाची जबाबदारी, कर्नाटकातही गुन्हा दाखल !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com