-Salluddin Chopdar
Maan News : खारघर प्रकरणात Kharghar Incident जे मृत्यूमुखी पडले याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कार्यक्रम नियोजनाचा ठेका घेतलेल्या लाइट अँड शेअर इव्हेंट कंपनी, कन्सेप्ट कम्युनिकेशन कंपनी जबाबदार असून, यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या Shivsena नेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी म्हसवड येथे पत्रकारांशी बोलताना केली.
अंधारे म्हणाल्या, ‘‘राज ठाकरेंनी वेगळे बोलून बुद्धी भ्रम करू नये. सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करायचे असतील, तर ज्यांच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नदीवर मृतदेह तरंगले. त्या योगी आदित्यनाथ यांच्यावर करावा. कोरोना काळातील झालेल्या मृत्यूमुळे उद्धव ठाकरेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती.
कोरोना महामारी ही निसर्गनिर्मित होती आणि खारघरमधील घटना ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे मानवनिर्मित आहे. तुम्ही गर्दी राजकारणाच्या हेतूने जमवली असेल, तर याचे राजकारण अपरिहार्य आहे.’’ कोरोना काळाविषयी बोलायचे झाले तर देवेंद्र फडणवीस यांचे कोरोना काळातील वर्तन कसे होते. एकदा अभ्यासावे.
कोरोना काळात सीएम केअरच्या ऐवजी पीएम केअरला सर्व निधी द्या, असे आवाहन भाजप करत होते. हे कोरोना काळातले राजकारण नव्हे का? संदीप देशपांडेला खर्चटले नव्हते, तरी संपूर्ण भाजप धावत गेली होती. आता खारघरमध्ये एवढ्या लोकांचे जीव गेले आहेत, तरी भाजपचा एकही नेता त्यांना भेटायला का जात नाही, असा सवाल करून अंधारे म्हणाल्या, ‘‘मुद्दा जर राजकारणाचा असेल तर कोरोना काळात गर्दी टाळणे हा उपाय होता.
मंदिर उघडण्यासाठी आग्रही असणारे आणि सुपारीबाज लोकांना पुढे करून आंदोलन करणारे भाजपचेच नेते होते. उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात काय काम केले, याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले होते. कोरोना काळात चांगले काम करणारे मुख्यमंत्री म्हणून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने युनोने दखल घेतली. कदाचित ही बाब राज ठाकरे यांना माहीत नसावी.’’
लोक आता वेडे नाहीत...
मराठा आरक्षणाबाबत त्या म्हणाल्या, ‘‘मराठा समाजास आरक्षणाचे गाजर हे भाजप त्यांच्या सोयीनुसार करत असते. जेव्हा ते सत्तेत नसतात. तेव्हा ते हनुमान चालिसा भोंग्यांचे राजकारण करत असतात. अगदी त्या पद्धतीने मराठा आरक्षणाचे राजकारण, एसटी कामगारांचे भडकावून देण्याचे काम ही भाजपची नीती आहे. लोक आता वेडे नाहीत.’’
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.